देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पोलीस दलाचे पगार खाते एक्सिस बँकेत उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हा निर्णय तेव्हा खूपच वादग्रस्त ठरला होता कारण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्याच बँकेत काम करत होत्या. त्यानंतर नागपूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीकडे चौकशीची मागणी केली होती. पण त्या मागणीकडे दुर्लक्ष करुन फक्त भाजप विरोधकांनी चौकशी का केली जाते आहे असा सवाल मोहनीश जबलपुरे आणि एड. सतीश उके यांनी केला आहे.
एड. सतीश उके यांनी याआधी केलेल्या तक्रारीमुळेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपप्रकरणी देवेद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. सध्या या प्रकरणात ते जामिनावर बाहेर आहेत. भाजप ईडीचा वापर करुन घेत आहे, पण फडणवीस यांच्यांवरील आरोपांची चौकशी मात्र ईडी का करत नाही असा सवाल त्यांनी केला आहे.