BJP Ticket Distribution Controversy : नाराज समर्थकांमुळे महापालिका निवडणुकीत बसू शकतो भाजपला फटका ?

Update: 2026-01-01 04:45 GMT

महानगरपालिका निवडणुकांतील चित्र...तिकिट न मिळाल्यानं... नाराज कार्यकर्ते... पक्षाने आमच्यावर अन्याय केला... अनेक महिलांचा टाहो... कुणी नेत्यांवर आक्रमक... असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Municipal Corporation Elections महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी (१५ जानेवारीला मतदान) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षात (BJP) तिकीट वाटपावरून मोठा गोंधळ उडाला. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या नेत्यांना किंवा नातेवाईकांना तिकीट दिल्याने राज्यभरात भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं.

दरम्यान एका उमेदवारीची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे भाजपच्या तिकीट वाटपात 'अमन की आशा' पहलगाम हल्ल्यानंतर असं विधान करणाऱ्या पूजा जाधव यांना पुणे महापालिकेसाठी तिकीट देण्यात आल्यानं सोशल मीडियावर टीका होत आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक १ मधून पूजा जाधव यांची उमेदवारी कट झाल्यानंतर शेवटच्या क्षणी प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूर चाळमधून भाजपाकडून पूजा जाधव यांना उमेदवारी देण्यात आल्यानं राजकीय समीकरणे बदलली असून भाजपासह पूजा जाधव यांच्यावर भाजपा समर्थकांनी आणि नेटिझन्सने टीकेची झोड उठवली आहे.

पूजा जाधव या सुरुवातीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पदाधिकारी होत्या आणि नंतर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्या होत्या. मराठा कार्यकर्ते धनंजय जाधव यांच्याशी विवाह केल्यानंतर, आता त्या आरपीआय(ए) च्या कोट्यातून पुण्यातून भाजपच्या अधिकृत उमेदवार बनल्या आहेत. हा मोठा राजकीय बदल आहे.

या सर्व घडामोडीनंतर सोशल मीडिया एक्सवर अनेकजन या उमेदवारीवर व्यक्त होत आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे @PrasadVKathe यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

दरम्यान प्रसाद काथे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर शाब्दिक हल्ला करत या उमेदवारीवरून थेट सवाल केला आहे. ते म्हणताहेत की, मुरली अण्णा, मोदींच्या मंत्रिमंडळात बसून मोदींना शिव्या देणाऱ्यांना तिकिटं देताना काही वाटतं की नाही? पुणेकरांनी अशा लोकांना का निवडून द्यायचं?

एक्स यूजर @garg_trupti यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी एक्सवर पोस्ट केली आहे की, "पहलगाम हल्ल्यानंतर अमन की आशा करणाऱ्या या पूजा जाधव महिलेला आठवा. आपण सर्वांनीच तिचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी असलेले संबंध उघड केले होते. आता तिला भाजप नागपूरकडून तिकीट देण्यात आले आहे. असं लिहून या पोस्टसोबत तृप्ती यांनी एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. जो जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतरच्या निदर्शनाचा आहे.


हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेक नेटिजन्सने भाजपच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

एका यूजरने म्हटले, "दहशतवाद समर्थकांना तिकीट? @NitinNabin @BJP4India तुम्हाला जनतेला उत्तर द्यावे लागेल." आणखी एकाने टीका केली, "पुढे दाऊद इब्राहिमला आमदारकीचे तिकीट द्या @Dev_Fadnavis." अशा टीका भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर होऊ लागल्या आहेत.

सचिन (मोदी का परिवार) या यूजरने काय म्हटलं पाहा.


प्रवीण या युजरने फोटो पोस्ट करत काय लिहिलं आहे पाहा


भाजप समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे असंतोष पसरला आहे. पूजा जाधव यांच्या भूतकाळातील राजकीय संबंध आणि काश्मीरमधील निदर्शनांमुळे त्यांना 'दहशतवाद समर्थक' किंवा 'अमन की आशा'च्या नावाखाली पाकिस्तानशी संबंधित म्हणून पाहिले जात असल्याचं टीकाकारांचे मत आहे. मात्र, भाजपच्या अधिकृत सूत्रांकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. पुणे महापालिकेत भाजप १३७ जागा लढवत असून, महायुतीतील जागावाटपामुळे आधीच वाद आहेत. या नाराजीमुळे बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १५ जानेवारीच्या मतदानापर्यंत पक्षश्रेष्ठी ही टीका कशी हाताळतात, याकडे लक्ष लागले आहे.


जागावाटपामुळे भाजपाला फटका

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, सांगली आदी शहरांमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलने केली, तर काही ठिकाणी एबी फॉर्म वाटप करणाऱ्या नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग करण्यापर्यंत प्रकार घडले. नाशिकमध्ये तर चक्क 'फिल्मी स्टाइल'मध्ये भाजप नेत्यांच्या गाड्यांचा पाठलाग झाला. शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार सीमा हिरे आणि राहुल धिकले यांच्या ताफ्यातील गाड्या इच्छुक उमेदवारांनी नाशिक-मुंबई महामार्गावर पाठलाग केल्या. पंचवटी आणि न्यू सिडको भागातील कार्यकर्त्यांनी निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप करत एबी फॉर्म हिसकावण्याचा प्रयत्न केला. येथे माजी महापौरांसह १६ हून अधिक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना तिकीट नाकारल्याने नाराजीचा उद्रेक झाला. छत्रपती संभाजीनगरात भाजप कार्यालयाला घेराव घालण्यात आला. निष्ठावंतांना डावलून मंत्र्यांच्या पीए आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप करत कार्यकर्ते आक्रमक झाले. एका महिला पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर काहींनी डोळ्यात पाणी आणणाऱ्या दृश्यांमध्ये नाराजी व्यक्त केली. ठाण्यात भाजप कार्यालयाची तोडफोड झाली, तर नवीन मुंबईत आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या मुलाला आणि कार्यकर्त्यांना मिळालेले एबी फॉर्म नाकारले. पुणे आणि हडपसर भागातही निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते संतप्त आहेत. सांगलीत माजी नगरसेविका उषा पवार यांनी तिकीट डावलल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. चंद्रपूरमध्ये तर महानगर अध्यक्षाने प्रदेशाध्यक्षांच्या फायनल यादीत बदल करून १० हून अधिक उमेदवार बदलले, ज्यामुळे अंतर्गत वाद उघड झाला. भाजप नेते गिरीश महाजन यांनी ही नाराजी स्वीकारली आणि म्हणाले, "जागा मर्यादित असताना इच्छुकांची संख्या हजारोंमध्ये आहे, त्यामुळे काही प्रमाणात असंतोष अपरिहार्य आहे."मात्र, कार्यकर्ते म्हणतात की बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य दिल्याने पक्षाची मूळ कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. महायुतीतील जागावाटपामुळेही भाजपला फटका बसला आहे. मुंबई महापालिकेत भाजप १३७, तर शिंदे सेना ९० जागा लढवत असली तरी इतर महापालिकांमध्ये युती तुटली. पुणे आणि संभाजीनगरात भाजप-शिंदे सेना स्वतंत्र लढत आहेत.



Similar News