Threat to Life : माझ्या जीवाला धोका, राजू परुळेकर यांची खळबळजनक पोस्ट

जर भविष्यात माझ्यावर कोणताही घातपात झाला तर तो करणारा व्यक्ती बहुजन किंवा अन्य धर्मीय असला तरी तो 'ब्रेनवॉश्ड' असल्याचे समजावे. अशा व्यक्तीला दोषी धरू नये, तर खरा कट रचणाऱ्या सनातनी किंवा ब्राह्मण संघटनांचा शोध घ्यावा - राजू परुळेकर

Update: 2025-12-30 09:28 GMT

Raju Parulekar राजू परुळेकर यांची खळबळजनक पोस्ट : ब्राह्मणवादी आणि सनातनी संघटनांकडून Death Threat जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप

Senior writer, poet, and political analyst ज्येष्ठ लेखक, कवी आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी सोशल मीडियावर (Facebook) एक खळबळजनक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी थेट Brahminical Organizations ब्राह्मण, ब्राह्मणवादी आणि Sanatani सनातनी संघटनांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही तुरळक अपवाद वगळता सर्वच अशा संघटनांकडून धोका असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

परुळेकर यांच्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत लिहिले आहे की, ते कोणालाही घाबरत नाहीत, मात्र जर भविष्यात त्यांच्यावर कोणताही घातपात झाला तर तो करणारा व्यक्ती बहुजन किंवा अन्य धर्मीय असला तरी तो 'ब्रेनवॉश्ड' असल्याचे समजावे. अशा व्यक्तीला दोषी धरू नये, तर खरा कट रचणाऱ्या सनातनी किंवा ब्राह्मण संघटनांचा शोध घ्यावा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणतात, "माझे पुराव्यासहितचे सत्य त्यांना पचत नाही. या सर्व संघटना काय करत आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे." तरीही ते महात्मा गांधींचा सत्य आणि अहिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. राजू परुळेकर हे मराठी साहित्य आणि राजकीय विश्लेषण क्षेत्रातील परिचित नाव आहे. त्यांच्या ब्लॉग आणि लेखनातून ते नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर बिनधास्त मत मांडतात. 

Full Viewया पोस्टमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परुळेकर यांनी यापूर्वीही विविध वादग्रस्त मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे. मात्र, थेट जीवाला धोक्याचा आरोप करणारी ही पहिलीच पोस्ट असल्याने ती विशेष लक्षवेधी ठरत आहे.

(सद्यस्थितीत या आरोपांबाबत कोणत्याही संघटनेकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांकडूनही कोणतीही तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आलेली नाही.)

Similar News