शेअर होल्डर्स साठी आनंदाची बातमी, अॅक्सिस बँकेच्या शेअर्सची किंमत दुसऱ्या तिमाहीतील उच्चांकावर
आपण जर अॅक्सिस बॅंकेचे शेअर होल्डर असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. अॅक्सिस बँकेच्या एका शेअरची किंमत 873.90 रुपयांवर गेली आहे. या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहित सर्वाधिक उच्चांकावर ही किंमत पोहोचली आहे. 21 ऑक्टोबर रोजी सुरुवातीच्या व्यापारात सुमारे सहा टक्क्यांनी वाढ झाली, एका दिवसानंतर खाजगी क्षेत्रातील या बॅंकेने सप्टेंबर तिमाहीतील उच्चांक नोंदवला.
अॅक्सिस बँकेने 20 ऑक्टोबर रोजी सर्व अंदाजांना मागे टाकत सप्टेंबर तिमाहीत 5,329.77 रुपयांच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 70 टक्के वाढ नोंदवली. याशिवाय बँकेच्य निव्वळ नफ्यात २९ टक्के वाढ झाली.
शिवाय बॅंकेचं निव्वळ व्याज उत्पन्न दरवर्षी 31 टक्क्यांनी वाढून 10,360.3 कोटी रुपये झाले. निव्वळ व्याज मार्जिन 3.96 टक्के होते, वर्षभरात 57 बेस पॉइंट्सची वाढ आणि 36 bps ची अनुक्रमिक वाढ झालेली आहे.