२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन... हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. याच दिवसाचं महत्त्व समजून १० वर्षापूर्वी २६ जानेवारी २०१६ साली मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून सत्य पत्रकारितेची चळवळ सुरु झाली. हा प्रवास अद्यापही सुरु आहे. "सर्व काही शक्य आहे." या ब्रीद वाक्यावर अनेक संकटांना सामोरं जाऊन महाराष्ट्रातल्या तळागळातल्या जनतेचा आवाज बनून मॅक्स महाराष्ट्र काम करत आहे. आज मॅक्स महाराष्ट्रचा वर्धापन दिवस...