Commission Culture in Politics : कमीत कमी ५% कमिशन घ्या, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझींचे वादग्रस्त विधान

Update: 2025-12-23 06:01 GMT

Union Minister for Micro, Small and Medium Enterprises केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM)चे संरक्षक Jitan Ram Manjhi जीतन राम मांझी यांनी पुन्हा एकदा Political राजकीय वादंग निर्माण केला आहे. गया येथे पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट सांगितले की, "प्रत्येक खासदार आणि आमदार कमिशन घेतो. खासदाराला सांसद निधीतून ५ कोटी रुपये मिळतात. त्यात १० टक्के कमिशन घेतले तर ४० लाख रुपये होतात. १० टक्के नाही मिळाले तर किमान ५ टक्के तरी घ्या आणि त्यातून पक्ष चालवा."

मांझी यांनी आपल्या मुलाकडे आणि पक्षाध्यक्ष संतोष कुमार सुमन यांच्याकडे बोट करून सांगितले की, पक्ष मजबूत करण्यासाठी अशा कमिशनच्या पैशांचा उपयोग करा. ते म्हणाले, "मी स्वतः अनेकदा माझे कमिशनचे पैसे पक्ष निधीत दिले आहेत. यंदाचं वर्ष आणि गेल्या वर्षीचे मिळून ८० लाख रुपये पक्षाला मिळू शकतात, ही छोटी रक्कम नाही."


या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मांझी यांनी पक्षासाठी राज्यसभेची एक जागा मागितली असून, ती न मिळाल्यास एनडीए सोडण्याची धमकीही दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी एनडीए आणि पंतप्रधान मोदींप्रती निष्ठा व्यक्त करत स्पष्टीकरण दिले की, त्यांचे विधान वैयक्तिक मत असल्याच त्यांनी सांगितलं.

विरोधी पक्ष राजदने या विधानाचा निषेध करत एनडीएतील भ्रष्टाचार उघड झाल्याचा दावा केला आहे. राजद नेते शक्ती सिंह यादव यांनी म्हटले की, "एनडीएमध्ये सर्व काही ठीक नाही. मांझींचे हे विधान दिल्ली ते पटना पर्यंत कमिशनखोरी चरणसीमेवर असल्याचे दाखवतं." मांझींच्या या विधानाने राजकारणातील 'कमिशन संस्कृती'वर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता पाहावे लागेल की, एनडीए यावर कशी प्रतिक्रिया देते आणि मांझींच्या मागण्यांचही काय होते.

Similar News