Boiler Insurance Policy : विमाधारकांना दिलासा,'दोष नंतर दिसला' हे कारण कंपनी देऊ शकत नाही - सुप्रीम कोर्ट
Boiler Insurance Policy बॉयलर विमा संरक्षण घेतल्यानंतर एखाद्या उपकरणात, मशीनमध्ये किंवा वाहनात काही दोष आढळला तरी विमा कंपनी तो दावा नाकारू शकत नाही. पॉलिसी घेतल्यानंतर दिसलेला दोष हा दावा नाकारण्याचा आधार होऊ शकत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोपरगाव सहकारी साखर कारखान्या एका प्रकरणात दिला आहे. या प्रकरणात बॉयलर तपासणीत जंग आणि आतील नुकसान दिसल्याने विमा कंपनीने दावा नाकारला होता. विमा कंपनीने दावा केला होता की, हे नुकसान पॉलिसीपूर्वी आहे. त्यामुळे आम्ही भरपाई देऊ शकत नाही. यावर पॉलिसी घेताना सांगितले गेले नाही. त्यामुळे हा दावा नाकारण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत फेटाळला.
नेमकं सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
•जरी पॉलिसी घेताना दोष दिसत नव्हता.
•तपासणी योग्य पद्धतीने झाली असेल तर विमा कंपनी जबाबदार.
•फसवणूक (fraud) असल्याचे पुरावे नसल्यास दावा नाकारणे अन्यायकारक.
•पॉलिसी म्हणजे अनपेक्षित नुकसानीपासून संरक्षण.
•“नंतर सापडलेल्या दोषां”चे कारण देऊन विमा कंपनी जबाबदारी टाळू शकत नाही.
न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने नोंदविलेले मुख्य निरीक्षण…
•पॉलिसी जरी घेतली असली तरी नंतर एखादा तांत्रिक दोष सापडला, तर विमा कंपनीला जबाबदारी नाकारण्याचा हक्क नाही. •विमाधारकाला त्याच्या हक्काचा पूर्ण मोबदला (compensation) मिळालाच पाहिजे. या निर्णयामुळे देशातील लाखो विमाधारकांना दिलासा मिळाला आहे. यापुढे विमा कंपन्या आता “हा दोष नंतर दिसला” असा बहाणा देऊन दायित्व टाळू शकत नाहीत. नंतर सापडलेला दोष हा दावा नाकारण्याचा आधार होऊ शकत नाही.
बॉयलर विमा संरक्षण म्हणजे काय ?
बॉयलर विमा संरक्षण म्हणजे बॉयलर, प्रेशर प्लांट आणि इतर संबंधित उपकरणांना अचानक झालेल्या बिघाडामुळे, स्फोटामुळे किंवा अपघातामुळे होणाऱ्या भौतिक नुकसानापासून आणि आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणारी विमा पॉलिसी. यामध्ये दुरुस्ती किंवा बदलीचा खर्च, तसेच व्यवसायाच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई समाविष्ट असते.
citation - 2025 INSC 1315 Kopargaon Sahakari Sakhar Karkhana Ltd. v. National Insurance Co. Ltd.