Delhi : BJP प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी घेतली गृहमंत्री Amit Shah यांची भेट
BJP भाजपा प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री Amit Shah अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुका Election आणि महायुतीतील समन्वयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांमधील चर्चेचा सारांशही चव्हाणांनी शहांना दिला. MUmbai मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
रविंद्र चव्हाण आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय राहिले होते. ते सतत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करत होते. महायुती अमुक तारखेपर्यंत टिकवायची आहे अशी विधानं ही त्यांनी केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठली होती आणि अमित शाहांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदेंनी भाजप नेत्यांबाबत तक्रारीचा पाठा वाचला असं बोललं जातं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल तक्रार केल्याच सांगण्यात आलंय. चव्हाण यांच्यामुळे महायुतीत गैरसमज निर्माण होत आहे. दुसरीकडे कोकणातही रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्यामध्ये शाब्दिक वॉर सुरु आहे. नुकतच निलेश राणे यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर नगरपरिषद निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमित शाह आणि रविंद्र चव्हाण यांच्या भेटीला अतिशय महत्त्व आहे.