BMC Elections 2025 : रविंद्र चव्हाण यांचे शब्द फिरले, आगामी निवडणुकात महायुती म्हणून लढणार!

Update: 2025-12-12 06:51 GMT

राजकारणात वैर शब्द कधी असूच शकत नाही. Politics राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचं हित फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे Maharashtra Local Body Elections आगामी निवडणुकांसाठी ज्या ज्या शक्यता आहे त्याचा विचार महायुतीत करण्याचं काम वरिष्ठ पातळीवर करण्याचा निर्णय झाला आहे. असं Maharashtra BJP President रविंद्र चव्हाण Ravindra Chavan यांनी Nagpur पत्रकार परिषदेत Press Conference म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी MahaYuti Alliance महायुतीत वादाची ठिणगी पडली होती. तिन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेंकांविरोधात टिका-टिप्पणी करत होते. यावर  Eknath Shinde Amit Shah Meeting एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांच्या भेट घेतली होती. त्यानंतर अमित शहा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना कानमंत्र देत आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे हित लक्षात आणून दिले.





 दरम्यान या भेटीनंतर गुरूवारी चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनितीवर सखोल चर्चा करण्यात आली.




या भेटीनंतर रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. या चर्चेत प्रामुख्याने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कशा पद्धतीने पुढे जायचे आणि युतीत जागा वाटप आणि समन्वय कसा असावा, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या भेटीपूर्वी भाजपने आपल्या कोअर टीमची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. त्या बैठकीतील निष्कर्षांवर आधारित रणनीती आणि प्रस्तावित योजना शिंदे-फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

निवडणुकीच्या तयारीसाठी पक्ष संघटनात्मक पातळीवर कोणत्या सुधारणा कराव्या लागतील, यावरही चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने सुरू झाली आहे. या प्रक्रियेला गती मिळाल्याने येत्या जानेवारी महिन्यात या महापालिका निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या तयारीसोबतच २० डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातही या बैठकीत अंतिम रणनीती निश्चित करण्यात आली आहे, असे रविंद्र चव्हाणांनी म्हटले.

Similar News