"प्रतिनिधित्व नाकारल्याने मुस्लिमांना धर्माच्या आधारावर Reservation देण्याची गरज निर्माण होईल"

शोषित, वंचित समुदायाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठीच हे संविधान आहे. मुस्लीम समुदायाला प्रतिनिधित्व नाकारल्यामुळे येणाऱ्या काळात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी पुढे येईल अशी चिंता रविंद्र आंबेकर यांनी व्यक्त केली.

Update: 2025-11-27 04:35 GMT

मुस्लीम समुदायाला Muslim Community मुख्य प्रवाहातून कशा पद्धतीने बाहेर काढलं जातयं त्यांना प्रतिनिधित्व representation नाकारलं जात आहे यावर मॅक्स महाराष्ट्राचे संस्थापक रविंद्र आंबेकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

संविधान दिनाच्या भाषणात ते म्हणतात की,  

आपल्या देशामध्ये धर्माच्या नावावर आरक्षण Religious-based Reservationनाही. येणाऱ्या काळात माझी अशी भिती आहे की, ज्या पद्धतीने मुस्लिम समुदायाला, मुस्लिम धर्मियांना प्रतिनिधित्व नाकारलं गेलंल आहे. Political Representation या देशामध्ये मुस्लीम समुदायाची मोठी चळवळ उभी राहिल आणि धर्माच्या आधारावर त्यांना आरक्षण देण्याची  Muslim Reservationगरज निर्माण होईल.  इतक्या टोकाच्या द्वेषावर आधारित हे राजकारण आहे. ज्याने एका संपूर्ण धर्माला संपूर्ण राजकीय व्यवस्थेमधलं सगळं प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे. केवळ नाकारलंच नाही तर ते दिलच नाही. हीच गोष्ट शोषित, वंचित, SC, ST इ. घटकांच्या वाट्याला सुद्धा हळू-हळू येणार आहे. राजकीय प्रतिनिधित्व हा मूळ हक्क आहे या देशातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण चालवण्याचा, या प्रवाहापासून एक मोठा घटक बाजूला केला याची चर्चा नाही, कुठेही विरोध नाही, विद्वानांमध्ये याबाबतीत चिंता व्यक्त होत नाही. फक्त डिबेटमध्ये मुस्लिमांना लेबलिंग लावून टाकायच. या देशातील मोठ्या समाजाला म्हणजे २० टक्के लोकसंख्येला प्रतिनिधित्व नाकारल्याची चर्चाच नाही. अशापद्धतीने अनेक घटकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्याच्या काळात ही मोठी चिंतेची बाब मला वाटते. शेवटी आपण कुणालाही लेबल न लावता आपण भारतीय आहोत, भारतीय म्हणून आपली ओळख कायम असली पाहिजे. जातीची, प्रांताची लेबलं लावून कुणालाही बाहेर काढता कामा नये. कारण या प्रवाहामध्ये आणण्यासाठीच तर हे संविधान आहे. 

Full View

Similar News