खाकीतील माणुसकीचे पुन्हा दर्शन; पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केली निराधाराला मदत

Update: 2021-10-01 13:01 GMT

अर्धांगवायू झालेल्या एका निराधार इसमाला शिर्डी येथील साई आश्रम अनाथालयात निवारा उपलब्ध करून देत एका निराधाराला आधार देण्याचं काम कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोपरगाव शहरातील भगवान महावीर पथ येथील पालिकेच्या नवीन वाचनालयाच्या इमारतीच्या परिसरात शहरातील एक अर्धांगवायू झालेल्या निराधार इसम गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ऊन वारा पावसात तो तेथे राहत होता. या भागातील नागरिकांनी , नगरसेवकांनी त्याच्या घरच्यांचा शोध घेतला असता त्याचा कोणीही सांभाळ करू शकत नाही असे समजले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक अमित खोकले पालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मेवाते यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तात्काळ पालिकेच्या नवीन वाचनालयाच्या इमारती जवळ येऊन पाहणी केली व या इसमाला अनाथ आश्रम येथे पाठवून त्याला आधार देण्याचा निर्णय घेतला व पुढे मंग सुरू झाली तयारी या इसमाला अनाथालयात पाठविण्याची. अमित खोकले मेवाते यांनी या इसमाला आंघोळ घालत दाढी कटींग करत नवीन कपडे परिधान केले व त्याला शिर्डी येथील साई आश्रम अनाथालयात रवाना करण्यात आले आहे. तसेच त्याच्या अर्धांगवायूच्या आजारावर देखील पुणतांबा येथील रुग्णालयात संपर्क करून त्याच्यावर उपचार केले जाणार असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News