Swiggy Zomato Strike : तुमच्या न्यू इयर पार्टीचे पार्सल अडकणार ? २५ आणि ३१ डिसेंबरला डिलिव्हरी बॉयज संपावर

Swiggy Zomato Strike: Will your New Year's party order be delayed? Delivery boys to go on strike on December 25th and 31st.

Update: 2025-12-25 07:42 GMT

नाताळ आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करायचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. स्विगी (Swiggy), झोमॅटो (Zomato), झेप्टो (Zepto), ब्लिंकिट (Blinkit) तसेच अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सचे डिलिव्हरी पार्टनर देशभरात संपावर जात आहेत. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन (TGPWU) आणि इंडियन फेडरेशन ऑफ अॅप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (IFAT) या संघटनांनी २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपाची हाक दिली आहे.

संप कशासाठी ?

'गिग इकॉनॉमी'मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या परिस्थितीवरून हा वाद पेटला आहे. डिलिव्हरी वर्कर्स, जे लॉजिस्टिक क्षेत्राचा कणा मानले जातात, त्यांनी कंपन्यांच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला आहे.

युनियनच्या मते, कामगार सध्या खालील समस्यांशी झगडत आहेत :

१. उत्पन्नात होणारी घट

२. कामाचे अनिश्चित आणि खूप जास्त तास

३ सुरक्षेचा अभाव आणि टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी होणारी धावपळ

४ कोणतेही कारण न देता आयडी (ID) ब्लॉक करणे

५ सोशल सिक्युरिटी (सामाजिक सुरक्षा) आणि मूलभूत कल्याणाच्या सुविधांचा अभाव

गिग कामगारांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?

या संपाद्वारे डिलिव्हरी कामगारांनी खालील मागण्या लावून धरल्या आहेत: 

१. योग्य आणि पारदर्शक पगार : कामाचे तास आणि वाढता खर्च याचा विचार करून योग्य मोबदला मिळावा.

२.१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर बंदी : १० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या 'अल्ट्रा-फास्ट' मॉडेल्समुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होतो, त्यामुळे ते बंद किंवा सुरक्षित करावेत.

३. मनमानी कारभार थांबवा : योग्य चौकशीशिवाय कामगारांचे अकाऊंट सस्पेंड किंवा ब्लॉक करू नयेत.

४. सुरक्षा आणि विमा : अपघात विमा, आरोग्य विमा, पेन्शन आणि सेफ्टी गिअर्स (हेल्मेट इ.) पुरवण्यात यावेत.

५. कामाची हमी आणि विश्रांती : कामाचे वाटप निश्चित असावे आणि कामादरम्यान विश्रांतीसाठी वेळ (Rest breaks) मिळावा.

६. तक्रार निवारण : ॲपमधील तांत्रिक त्रुटी, पेमेंट फेल्युअर आणि रूटिंगच्या समस्या सोडवण्यासाठी मजबूत यंत्रणा असावी.

सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

मेट्रो शहरे आणि टियर-२ शहरांमध्ये या संपाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. २५ आणि ३१ डिसेंबर हे दिवस म्हणजे ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीचे असतात, जेव्हा ऑनलाइन ऑर्डर्सचा ओघ सर्वाधिक असतो. अशा वेळी डिलिव्हरी पार्टनर्सनी काम बंद ठेवल्यास ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागू शकते.

Tags:    

Similar News