Radical Left Scum : विरोधकांवर शाब्दिक हल्ला करत Donald Trump यांनी दिल्या Christmasच्या शुभेच्छा !

Update: 2025-12-25 03:23 GMT

US President Donald Trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी Christmas ख्रिसमसच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. X platform एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली असून यात त्यांनी सर्वांना wishing everyone a Merry Christmas ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या, मात्र डाव्या विचारसरणीच्या लोकांना "रॅडिकल लेफ्ट स्कम" म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

नेमकं काय म्हटलंय डोनाल्ड ट्रम्प यांनी.. 

"सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा, यात रॅडिकल लेफ्ट स्कमचा समावेश आहे जे देश नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते दुबळेपणाने अपयशी ठरत आहेत. आता आमच्याकडे खुल्या सीमा, महिलांच्या खेळांमध्ये पुरुष, प्रत्येकासाठी ट्रान्सजेंडर किंवा कमकुवत कायदा अंमलबजावणी यांसारख्या गोष्टी नाहीत. आमच्याकडे सध्या विक्रमी शेअर बाजार आणि ४०१ हजार योजना, दशकातील सर्वात कमी गुन्हेगारीची आकडेवारी, महागाईचा नाही, आणि काल जाहीर झालेला ४.३ टक्के जीडीपी आहे, जो अपेक्षेपेक्षा दोन टक्के जास्त आहे. टॅरिफमुळे आम्हाला ट्रिलियन्स डॉलर्सची वाढ आणि समृद्धी मिळाली आहे आणि आमची राष्ट्रीय सुरक्षा आता कधीही नव्हती तितकी मजबूत आहे. आमचा पुन्हा आदर होऊ लागला आहे, कदाचित कधीही नव्हता इतका. गॉड ब्लेस अमेरिका!!! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जॉन ट्रम्प.

ही पोस्ट अमेरिकेच्या वेळेनुसार ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला करण्यात आली असून, त्यात ट्रम्प यांनी आपल्या प्रशासनाच्या यशांचा उल्लेख केला आहे. मात्र, त्यातील काही दाव्यांवर टीका होताना पाहायला मिळत आहे. उदाहरणार्थ, जीडीपी वाढ ४.३ टक्के ही तिसऱ्या तिमाहीची (जुलै-सप्टेंबर २०२५) आहे, जी नुकतीच जाहीर झाली. महागाई पूर्णपणे शून्य नाही, तर सध्याचा दर नोव्हेंबरमध्ये २.७ टक्के आहे. गुन्हेगारीत मोठी घट झाली असली तरी "दशकातील सर्वात कमी" हा दावा अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं बोललं जात आहे.शेअर बाजार विक्रमी उच्चांक गाठत आहे हे खरं आहे. ट्रम्प यांची ही पोस्ट त्यांच्या नेहमीच्या शैलीत आहे, ज्यात ते राजकीय विरोधकांवर हल्ला करतात आणि आपल्या धोरणांचे कौतुक करतात. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची टीका केली आहे. अमेरिकेत ख्रिसमस साजरा होत असताना ट्रम्प यांची ही पोस्ट राजकीय वातावरण ढवळून काढत आहे.

Similar News