Narendra Modi हा देशाच्या नागरिकांसाठी नोकर आहे - बाळासाहेब आंबेडकर
प्रजा जर बेईमान असेल तर राजा कुठे ईमानदार असणारेय- बाळासाहेब आंबेडकर
खाजगीत अनेक जण मला खूप काही सांगत असतात, मी म्हणतो राजेहो मला जसं सांगताय तसं पब्लिकशी बोला. ते म्हणतात असं कसं बोलायचं तो बसलाय ना? कोण तर नरेंद्र मोदी... तर मी म्हणतो नरेंद्र मोदी या देशाचा नोकर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो जगासाठी भारताचा पंतप्रधान आहे आणि ते आम्ही मानतो. पण या देशाच्या नागरिकांसाठी नोकर आहे हे लक्षात घ्या. सत्ता ही खऱ्या तुमच्या हातामध्ये आहे. सत्ता ही सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे परंतु तोच जर विकला गेला तर...राजा तशी प्रजा या म्हणीचं उलट झालं आहे. प्रजा तशी राजा.... प्रजा जर बेईमान असेल तर राजा कुठे ईमानदार असणारेय. असं संविधान सन्मान महासभेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश (बाळासाहेब) आंबडेकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.