मुंबईतील इक्षु शिंदे यांचा ‘ग्लोबल फ्यूचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’ने सन्मान’
अमेरिकेतील गॅरीबे इन्स्टिट्यूटतर्फे गौरव
मुंबई : मुंबईतील विद्यार्थिनी इक्षु शिंदे यांची अमेरिकेतील The Garibay Institute for Soft Power and Public Diplomacy या संस्थेमार्फत Global Future Scholar & Diplomat म्हणून निवड झाली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, धोरण अभ्यास आणि समाजहिताची जाण यांचा समतोल साधणाऱ्या इक्षु यांना हा सन्मान त्यांच्या अभ्यासू कार्यशैली आणि कल्पक दृष्टिकोनामुळे देण्यात आला.
संस्थेने त्यांच्या निवडीविषयी म्हणताना, “इक्षु विश्लेषणात्मक विचार आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे प्रभावी मिश्रण घडवतात. नैतिक व बौद्धिक चौकट घडवणाऱ्या पुढील पिढीतील जागतिक नेतृत्वात त्या महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे विषद केले आहे.
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता बारावी ची विद्यार्थिनी असलेल्या इक्षु यांनी शाळेतील उत्तम शैक्षणिक कामगिरीसोबत सामाजिक सहभागातही आपली वेगळी छाप निर्माण केली. महाराष्ट्रातील निवडणूकी दरम्यान मतदार जागृती उपक्रम राबवताना त्यांनी कार्यशाळा आणि रॅलींचे आयोजन केले. या मोहिमेद्वारे ८,००० हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचत जागरूकता निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासोबतच कलाविश्वातही इक्षु चे योगदान ठळक आहे. त्यांनी सुमारे एका दशकापासून भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय आणि समकालीन नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. गुरु आदिती भागवत यांच्याकडे जयपुर घराणे शैली च्या कथ्थक कलेचे तसेच सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक Ashley Lobo यांच्या मार्गदर्शनाखाली द डान्सवर्कस या संस्थेत बॅले, जैज़, हिप हॉप चे धडे घेतले आहेत व प्रोफेशनल डांस सर्टिफिकेशन प्रोग्राम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी नृत्य सादर केले आहेत. CID–UNESCO (United Nations International Dance Council) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या त्या सदस्य आहेत.
हा सन्मान स्वीकारतांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरच्या वंशज असलेल्या व समाजकारणाचा वारसा लाभलेल्या इक्षू शिंदे यांनी गॅरीबे इन्स्टिट्यूट चे आभार मानले व त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. इक्षु शिंदे यांना मिळालेला हा सन्मान महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.