Covid 19 करोना महामारीत अनेक मुलांना आपल्या आई-वडीलांना गमवावे लागले. पालक नसल्यानं मुलांच्या संगोपनाचा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच समाजात अनेक Single Women एकल महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांचा खर्च, संगोपन करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. शिक्षक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी अनेक वर्षांपासून एकल महिलांचे प्रश्न यावर काम करतात. त्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने एकल महिलांच्या पुर्नवसनासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना सुरु केली. नेमकी काय आहे ती योजना आणि समाजातील अनेक क्षेत्रातील लोक एकल महिलांच्या पुर्नवसनासाठी कसे काम करू शकतात यांची माहिती वाचा.
तुमच्या शाळेतील Single Women Empowerment एकल महिलांच्या मुलांना दर महिन्याला २२५० रुपये बालसंगोपन शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी मदत करा. एकल महिलांच्या मुलांची माहिती राज्यातील सध्या सर्व जिल्ह्यात शाळांमधून घेतली जात आहे. तेव्हा या एकल महिलांच्या दोन मुला मुलींना प्रत्येकी २२५० रु शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळते. ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी शिक्षक, शाळा, पालकांनी प्रयत्न करावेत, ही विनंती. राज्यातील आम्ही साऊ एकल महिला समितीचे कार्यकर्ते एकल महिलांच्यासाठी राज्यात ७० तालुक्यात काम करतो. या योजनेची माहिती दिली आहे व तुमच्या जिल्ह्यातील आमचे कार्यकर्ते तुम्हाला यासाठी मदत करतील. त्यांचे जिल्हानिहाय क्रमांक खाली दिले आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना माहिती
आई किंवा वडील गमावलेल्या तसेच पात्र बालकांना या योजनेचा लाभ मिळवता येते. ते पालक सर्वसाधारण कुटुंबांतील असावेत. अनाथ, निराश्रित,बेघर व आपत्तीत असलेल्या बालकांचे संस्था बाह्य व कौटुंबिक वातावरणात संगोपन होण्याच्या दृष्टीने या मुलांना संस्थेत दाखल करण्याऐवजी कौटुंबिक वातावरणात त्याचे संगोपन होऊन त्याचा विकास घडवून आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना दि. ३० मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार राबविली जात आहे.
ही योजना कोणासाठी ?
० ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो. एका कुटुंबातील दोन किंवा जास्त ही बालकांची परिस्थिती पाहून लाभ दिला जातो. (पण कोरोना कुटुंबासाठी मुलांची संख्या व उत्पन्न अट नाही)
किती रक्कम मिळते ?
एकल महिलेच्या एका बालकासाठी २२५० ₹. रुपये प्रतिमहिना.
कोरोनामध्ये पालक गमावलेल्या लाभार्थी एका बालकास दरमहा ४ हजार ₹.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत...?
१)आधार कार्ड पालकांचं व बालकांचे.
२)शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
३)तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
४) मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
५) रहिवासी प्रमाणपत्र
६) बॅंक पासबुक
७) मृत्यूचा अहवाल
८) रेशन कार्ड
९) घरासमोर पालक व बालकांचे अंगणवाडी सेविकेसमवेत काढलेले छायाचित्र.
ही योजना मंजूर कोण करते ?
हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हा बाल कल्याण समितीकडे सादर केला जातो. त्यांनी लाभार्थी व पालकांसह सुनावणी घेतल्यानंतर मंजुरीनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालया मार्फत योजनेची अंमलबजावणी होते.
तालुका स्तरावर कोणाशी संपर्क करावा ?
तालुक्यातील पंचायत समितीच्या अंगणवाडी ऑफिसमध्ये जाऊन बालसंरक्षण अधिकारी यांना संपर्क करावा. अंगणवाडी सेविका,पर्यवेक्षिका व एकात्मिक बालविकास कार्यालय ही माहिती देऊ शकते... तिथे फॉर्म ही मिळेल.
आपल्या परिसरातील एक किंवा दोन पालक गमावलेल्या कुटुंबांना या योजनेची माहिती द्या व अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी मदत करा. फॉर्म भरताना काही अडचण आली तर संपर्कासाठी साऊ एकल महिला समितीचे जिल्हा समन्वयक:-
अडचण आल्यास आपल्या जिल्ह्यातल्या समन्वयक यांना फोन करा.
१) अहिल्यानगर:-
◆मिलिंदकुमार साळवे: ९८५०९६२५३५.
◆मुकुंद टंकसाळे: ९६६५५१५८२९.
◆अशोक कुटे: ९८५०२०३९१४.
२)संभाजीनगर
◆ज्ञानेश्वर निकम: ९८२२९९३९६२/
३) गडचिरोली
◆सूर्यप्रकाश गभणे: ९४२२८३४७३७.
४) चंद्रपूर
◆हरिश्चंद्र पाल: ९४२१७२१४२१
५)भंडारा
◆सोनिया डोंगरे: ९९२३६०७४१८.
६)गोंदिया:
◆अनिल मेश्राम : ९४२२३४४०९१
७) नागपूर
◆आशा बुरनारे: ९६६५४४०३६३.
संजय भोंडे. ९११२४७६८३३
८) वर्धा
◆नूतन माळवी: ९३२५२२२४२७.
९) अमरावती
◆संजीवनी पवार: ८३९०१३५६५४.
१०)यवतमाळ
◆राजश्री राऊत: ९६३७३७९६९३.
११)बुलढाणा
◆महेंद्र सोभागे: ९४२२३३५०६९.
१२)वाशिम
◆अश्विनी राम अवताडे:८७६६५९९०९६.
१३)अकोला
◆ तुषार हांडे: ९९२२९१९४५७.
१४) बीड
◆बाजीराव ढाकणे: ९४२०६५४१११.
१५)लातूर
◆सविता कुलकर्णी ९१५६१६८६१८
१६)धाराशिव
◆विजय जाधव: ७०३८७१२२२८.
१७)परभणी:
◆गजानन सुरवसे:७९७२३८८६०८.
१८)नांदेड
◆शकीला शेख: ९५८८४८६०११.
◆अंकुश खानसोळे पाटील:९४०५३८५०५०.
१९)जालना
◆डॉ. नूतन माघाडे: ९८२३१०९१२७.
२०) पुणे
◆मयूर बागुल: ९०९६२१०६६९.
२१) सांगली
◆प्रेमलाताई साळी: ८३२९७५६७२०.
२२) सातारा
◆प्रमोद भिसे:९१४५८११८०८.
२३) कोल्हापूर
◆सुरेखा राजेशिर्के: ९९६०७२००८७.
२४)सोलापूर
◆अँड.सविता शिंदे: ९७६७२११३०८.
२५)रत्नागिरी
◆वैदेही सावंत: ९१३०२०४४४७.
२६)धुळे
◆ईश्वर पाटील: ९२८४८५१०१९
२७)जळगाव
१)सुनील पाटील: ९४०५०५१७००.
२) पायल पाटील: ९९७५२८८६१६.
२८)नंदुरबार
◆विठ्ठल कदम:
९३०७१४३०१६.
२९) नाशिक
◆नलिनी सोनवणे: ८८०५०५९०८५.
३०)ठाणे-कल्याण:
◆राहूल परदेशी: ८८८८०८८६५४.
विद्या गडाख ९७०२६८१५०४
शिक्षक बंधू भगिनींनो या कामात सहभागी व्हा ..
शिक्षक बांधवांनी या कामात सहभागी व्हावे..आपल्या परिसरातील एकल महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी काम करावे. एकल महिलांसाठी आम्ही सारे कार्यकर्ते एकल महिलांच्या पुनर्वसनाचे काम करतो. आमच्या संघटनेचे नाव साऊ एकल महिला समिती आहे...राज्यातील ७० तालुक्यात आम्ही काम करतो व वर दिलेले कार्यकर्ते त्या जिल्ह्याचे समन्वयक आहेत. या कामात सहभागी होण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करा.. तुम्हीही तुमच्या परिसरात एकल महिलांचे काम सुरू करू शकता.. ते काम कसे करावे यासाठी मला मेसेज करा..
संपर्क
हेरंब कुलकर्णी
राज्य निमंत्रक
साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र
(एकल महिलांसाठी तुमच्या भागात काम सुरू करायचे असेल तर हेरंब कुलकर्णी यांना 8208589195 या क्रमांकावर मेसेज करावा..)