Maharashtra Public Holidays 2026 : लाडक्या बहिणींसाठी मिळाली का ‘भाऊबीजे’ला अतिरिक्त सुट्टी ?

Update: 2025-12-10 07:24 GMT

Maharashtra Government महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या Public Holidays जाहीर केल्या असून, भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील. याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 

दरम्यान, लाडक्या बहिनींना खुश करण्यासाठी सरकारने भाऊबीजेसाठी अतिरिक्त सुट्टी दिली आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Similar News