धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनींची भावनिक पोस्ट

Hema Malini's emotional post for Dharmendra

Update: 2025-11-27 13:50 GMT

बॉलीवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिलीय. एक्स वर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतच्या आठवणींना वाट मोकळी करुन दिलीय. (Hema Malini Remebers Dharmendra)

धर्मेंद्र यांनी माझ्यासाठी खुप काही केलंय. प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुली ईशा आणि आहाना यांच्यासाठी ते प्रेमळ वडील होते. माझ्यासाठी तर मित्र, तात्विक सल्लागार, मार्गदर्शक, कवी आणि प्रत्येक गरजेच्या वेळी माझा ‘जवळचा माणूस’ म्हणजे धर्मेंद्र होते. धर्मेंद्र खरंतर माझ्यासाठी सर्वकाही होते. ते चांगल्या आणि वाईट काळातूनही गेले. त्यांच्या सहज आणि मैत्रीपूर्ण वागण्यातून त्यांनी माझ्या कुटुंबातील सर्वांनाच आपलंस करुन घेतलं होतं, असं हेमा मालिनींनी पोस्टमध्ये म्हटलंय.

सेलिब्रेटी असूनही त्यांची साधी राहणी, त्यांची नम्रता यामुळं ते सर्व दिग्गजांमध्येही स्वतःची वेगळी छाप पाडत होते. चित्रपटसृष्टीत त्यांची लोकप्रियता, कामगिरी अजरामरच राहील, असेही हेमा मालिनी पोस्टमध्ये म्हणाल्या...

धर्मेंद्र यांच्या निधनानं माझं वैयक्तिक झालेलं नुकसान शब्दात सांगता येणार नाही. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी माझ्या उर्वरित आयुष्यभर सोबत राहिल. वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यानंतर, माझ्याकडे अनेक खास क्षण आणि आठवणी आहेत, पुन्हा जगण्यासाठी, अशा शब्दात हेमा मालिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Tags:    

Similar News