Dr. Babasaheb Ambedkar Free Tour Circuit : 3 ते 5 डिसेंबर रोजी बाबासाहेबांशी संबंधित स्थळांना भेट द्या- राज्य पर्यटन संचालनालय

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी महान कार्य, त्यांचे जीवनचरित्र, विचार पर्यटक व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या टूर सर्कीटचा मुख्य उद्देश आहे.

Update: 2025-12-01 00:19 GMT

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून Directorate of Tourism पर्यटन संचालनालयामार्फत दि. ३ ते ५ डिसेंबर २०२५ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’चे Dr. Babasaheb Ambedkar Tour Circuit आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील चैत्यभूमी येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी टूर सर्किट निःशुल्क असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी महान कार्य, त्यांचे जीवनचरित्र, विचार पर्यटक व नव्या पिढीपर्यंत new generation पोहोचविणे हा या टूर सर्कीटचा मुख्य उद्देश आहे. पर्यटकांनी या पर्यटन सर्किटचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई Tourism Minister Shambhuraj Desai यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर “पर्यटन सर्किट” Tourism Circuit ही केवळ एक पर्यटन संकल्पना नसून, India’s democracy भारताच्या लोकशाहीचा पाया रचणाऱ्या महामानवाच्या विचारांना अभिवादन आहे. त्यांच्या जीवनातील क्रांतिकारी कार्य, संघर्ष आणि आदर्श या परिपथाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने हाती घेतलेला हा उपक्रम, इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तन यांना जोडणारा प्रेरणादायी प्रवास आहे. या परिपथामुळे अनुयायी, पर्यटकांना डॉ. बाबासाहेबांच्या महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि त्यांच्या विचारसंपदेचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळेल. हा केवळ प्रवास नसून, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची अनुभूती आहे, असे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले.

कोणती स्थळे पाहता येणार ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटमध्ये Mumbai मुंबईतील Chaityabhoomi, Rajgriha चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स महाविद्यालय, वडाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, परळमधील बीआयटी चाळ, सिद्धार्थ महाविद्यालय, फोर्ट या स्थळांचा समावेश आहे. या टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळे आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवास, सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे.

टूर सर्कीट अंतर्गत दररोज ३ बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन संचालनालयाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन संचालनालयाने या सर्किटचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी हे टूर सर्किट महत्त्वपूर्ण ठरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर गणपती मंदिर, शिवाजी पार्क येथे पार पडेल. सदर टूर सर्कीटची सुरुवात चैत्यभूमी, दादर, मुंबई येथून सकाळी ९.३० वाजता होऊन सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर येथे होणार आहे.

टूर सर्कीटसाठी संपर्क :

सूरज चतुर्वेदी – ८१०८१७५५३०

पवन पवार – ७६६६६०३२११

पर्यटन संचालनालय चॅटबोट क्र – ९९९३३०८८८३

Similar News