सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ म्हणजे डॉ. बाबा आढाव - राहुल गांधी

Update: 2025-12-08 23:45 GMT

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचं निधन झालं आहे. ही बातमी समजताच देशाचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्सवर श्रद्धांजली देणारी पोस्ट शेअर केली आहे. 

सामाजिक न्यायाचे एक मजबूत आधारस्तंभ आणि एक महान कामगार नेते बाबा आढाव जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, शोषित आणि कामगार वर्गाच्या हक्कांसाठी समर्पित केले. पुण्यातून निघालेल्या त्यांच्या संघर्षाच्या ज्योतीने देशभर सामाजिक न्यायाचा मार्ग उजळवला, अशी म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


Similar News