Anjali Damania : माझे नाव,पत्ता वापरून RTI टाकू नका, स्वतः लढा नाही तर घरी बसा !
पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या Anjali Damania अंजली दमानिया सातत्याने भाष्य करत असताना त्यांच्या नावाचा गैरवापर करून RTI आरटीआय टाकले जात आहे. ही माहिती खुद्द अंजली दमानिया यांनी एक्सवर तक्रारीचा फोटो टाकून दिली आहे. या पोस्ट मध्ये त्या म्हणतात की, माझे नाव आणि पत्ता वापरून खूप ठिकाणी आरटीआय टाकल्या जात आहे. आणि आता तर एक तक्रार लोकायुक्तांकडे पाठवण्यात आली आहे. मी ही तक्रार केलेली नाही. माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की मला एक कॉल किंवा मेसेज करून आधी जाणून घ्यावे. ह्या लोकांना विनंती की माझे नाव वापरू नका. हिम्मत असेल तर स्वतः लढा आणि नसेल तर घरी बसा. अशा शब्दात त्यांनी नाव वापऱ्यांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही तक्रार कुणी केली आहे याची पडताळणी केल्याशिवाय तक्रार घेऊ नये अशी विनंती केली आहे.