साई मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - जगताप

दीड वर्षांपासून साई मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे शिर्डीसह सर्व पंचक्रोशीतील अर्थकारणाला फटका बसला आहे त्यामुळे साई मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता जगताप म्हटलं आहे.

Update: 2021-07-26 09:40 GMT

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिर्डीचे साईबाबा मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मागील दीड वर्षांपासून साई मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे शिर्डीसह सर्व पंचक्रोशीतील अर्थकारणाला फटका बसला आहे त्यामुळे साई मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष अनिता जगताप म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान म्हणून परिचित असलेल्या शिर्डीत देश-विदेशातील लाखो साईभक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र, मागील दीड वर्षापासून हे मंदिर बंद असल्याने शिर्डीतील व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना अनिता जगताप यांनी सांगितले की शिर्डी की येणाऱ्या साई भक्तांची संख्या कमी झाली आहे. साई भक्त हा शिर्डीच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मंदिर बंद असल्याने शिर्डीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. साईभक्त शिर्डीत येत असल्याने येथील हॉटेल व्यवसाय, हार- फुलं, फोटो ,मुर्ती ,आदींसह रिक्षा, टुरिस्ट वाहन व्यवसायिक आणि हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. शिर्डी परिसरातील 40 गावांचे अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. हे सर्व व्यवसाय सध्या पूर्णपणे ठप्प आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता गुजरात सरकारच्या धर्तीवर मंदिरे सुरू केली पाहिजे असे जगताप यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News