आज 14 नोव्हेंबर 2025 बिहार राज्यासाठी महत्त्वाचा दिवस… कारण आज बिहारची सत्ताखुर्ची कुणाच्या हाती लागणार हे स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जनतेला आश्वासित करण्याची चोख कामगिरी बजावली. मतदान प्रक्रिया पार पडली असून आज सकाळी 8 वाजतापासून 243 जागांसाठी मतदान मोजणीला सुरुवात होणार आहे.
या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की कधी नव्हे ते सर्वाधिक मतदान हे महिला मतदारांनी केलं आहे. कुठल्याही निवडणुकांत एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला बाहेर पडल्या नव्हत्या परंतु यंदा संपूर्ण बिहारमध्ये एकूण महिला मतदार 71 टक्के पुरुष मतदार 62 टक्के एवढं मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 65 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात 69.90 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. 2020च्या तुलनेत यंदा 9 टक्के मतदान जास्त झाले आहे. तसेच पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं असून बिहारचं भवितव्य ठरवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा सत्तेत येतील की, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सत्ता हाती घेईल हे काही तासांनी स्पष्ट होणार आहे. दुपारपर्यंत बिहारमध्ये सत्ता कुणाची असेल जनतेचा कौल कुणाची पदरी पडणार हे स्पष्ट होईल.
अधिकृत निकाल अपडेटसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाईटला https://results.eci.gov.in/भेट द्या.