धनंजय मुंडेंसमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, धनंजय मुंडेंनी घेतली दखल

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पालकमंत्र्यांसमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार बीड येथे घडला आहे.

Update: 2022-01-26 05:58 GMT

प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे पोलिस मुख्यालय येथे उपस्थित होते. यावेळी एकाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बीड शहरातील पंचशीलनगर येथे विनोद शेळके या व्यक्तीने बोगस रस्त्याच्या कामाची तक्रार केली होती. त्यावर कारवाई करण्यात न आल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर विनोद शेळके यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्रयस्थ पक्षाकडून चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

पालकमंत्री धनंजय मुंडे प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने बीड येथील पोलिस मुख्यालयात ध्वजारोहण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या समोरच विनोद शेळके यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. तर त्याची दखल घेत मंत्री मुंडे म्हणाले की, कोणताही रस्ता एका व्यक्तीसाठी नसतो. तो समाजासाठी असतो. पण एका व्यक्तीला जर वाटले की रस्ता बोगस होत आहे. तर त्याबाबत चौकशी केली जाईल. तर त्या व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून घेण्यापेक्षा चौकशीचे पत्र दिले असते. तरी चौकशी केली असती, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्याचबरोबर हा रस्ता बोगस असेल तर त्या रस्त्याची त्रयस्थ पक्षाकडून चौकशी केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

Tags:    

Similar News