मुख्यमंत्री राज्यपाल वादात अमृता फडणवीस यांचं ट्विट...

Update: 2020-10-14 04:27 GMT

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्यातील मंदिर उघडण्यावरुन लेटरवॉर सुरु आहे. आता या वादात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे.

"वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!" असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे. त्यामुळं शिवसेना अमृता फडणवीस यांना काय उत्तर देते. हे पाहणं महत्त्वाचे आहे.


काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत.

भाजप, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी मंदीर उघडण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वादात उडी घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र लिहून मंदीरं उघडण्याची मागणी केली होती.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असं म्हणत राज्यपालांना खास ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Tags:    

Similar News