Thanks Ambedkar : आंबेडकरी कार्यकर्ते हेच संविधानाचे खरे रक्षक - रविंद्र आंबेकर

जगातली सर्वांत मोठी संघटना पण त्यांच्याकडे स्वतःचा विचार नाही, साजरा करायला महापुरुष नाही. यांच्यापासून संविधानाला कसला धोका? संविधानाचं रक्षण करायला आंबेडकरी कार्यकर्ते सक्षम आहेत - रविंद्र आंबेकर

Update: 2025-11-27 03:20 GMT

...तर सगळ्यात मोठा विरोध आंबेडकरी समाजातून होईल असं भाकित २०१४च्या निवडूणक विश्लेषणात मी केलं होतं, जर का या राक्षसी बहुमताला आणखी वेगळे परिमाण लाभले आणि त्यातून जर काही वाईट होणार असेल तर त्याला सगळ्यात पहिला विरोध आंबेडकरी समाजातून होईल. तसेच ⁠बहुजन समाजाला एकत्र ठेवणे हेच मोठे आव्हान असल्याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानसभेत व्यक्त केलेली चिंता आज खरी ठरतेय. जगातली सर्वांत मोठी संघटना पण त्यांच्याकडे स्वतःचा विचार नाही, साजरा करायला महापुरुष नाही. यांच्यापासून संविधानाला कसला धोका? संविधानाचं रक्षण करायला आंबेडकरी कार्यकर्ते सक्षम आहेत. असं मॅक्स महाराष्ट्राचे संस्थापक रविंद्र आंबेकर यांनी संविधान दिनाच्या भाषणात म्हटलं आहे.

देशातील सद्यस्थिती पाहता स्वांतत्र्य ही देण्याची नाही तर जगण्याची गोष्ट आहे. सध्याच्या काळात समाजात सर्वच अंगाने ताण- तणाव वाढलेला आहे. देशातील चारही स्तंभ अतिशय वाईट परिस्थिती आहे. मीडियावरही दलाल असल्याचा ठपका लागला आहे. अशा या काळात संघटित होणं गरजेचं आहे. प्रत्येकांने आप-आपल्या पद्धतीने समता, बंधुता, प्रेम आत्मसात करत समाजात वावरलं पाहिजे. 

एकंदरित ७६वा संविधान दिनानिमित्त रविंद्र आंबेकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात संविधान दिन निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संविधान व भारतासमोरील आव्हानांबाबत विचार मांडले.


Full View

Similar News