समतावादी लेखकांचा Sharad Pawar Inspire Fellowshipला रामराम !
महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही आहोत असा समज निर्माण करुन सत्ताधाऱ्यांना शरण जाणाऱ्यांना विरोधकांना विरोध करणाऱ्या या लेखकांची भूमिका महत्त्वाची... भारताच्या बदलत्या सिस्टिमचे अडाणी हे प्रतिक झाले आहेत का? याला जबाबदार कोण ? वाचा स्तंभलेखिका भक्ती चपळगावकर यांचा लेख
दरवेळी South Mumbai दक्षिण मुंबईतून माझ्या मुलुंडच्या घराला जाताना Adani Real Estate complex अडानी रियल इस्टेटची एक मोठी वसाहत लागते. डोळे दिपवून टाकणारे दिवे लावलेली ही वसाहत अजून पूर्ण बनली नाही. ही नांदी आहे, या निवडणुकीच्या निकालाची Election आणि पुढच्या निवडणुकीत Marathi मराठी माणसाचा टक्का पंधरा टक्क्यावर येणार असल्याची. मग Mulund मुलुंड येते. Mumbai's salt pans, marshes, private forests मुंबईतील मिठाघरे, दलदल, खाजगी जंगलं आणि पलिकडे नॅशनल पार्क. इथे आलो तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडं बघून या कॉलनीच्या प्रेमात पडलो.
मुंबईत अशीच झाडं अनेक ठिकाणी आहेत.. होती. आता बाजूच्या अठ्ठावन्न एकराच्या जागेत चाळीस हजार माणसं वसवायला रात्रंदिवस काम सुरू आहे. तिथे धारावीत राहणारे लोक येणार आणि धारावीत अडाणी. या चाळीस हजार लोकांना इथे कबुतरांची खुराडी मिळणार. काम थांबायला नको म्हणून रात्रंदिवस जेसीबी सुरू असतात. अवतार सिनेमाची आठवण यावी असे. स्वतःच्या लालसेपोटी दुसऱ्या ग्रहाला पोखरणाऱ्या मानवाची. इथले मूळ रहिवासी - अजगर, मुंगुंसं, साप, मैना, कोकीळ, कोल्हे सगळे बेघर झालेत, जिथे धारावीतले लोक घर वाचवू शकले नाहीत, माणूस असून तिथं हे कुठे दाद मागणार?
अडाणी हे प्रतिक आहे भारताच्या बदलत्या सिस्टिमचे. इथे लोकशाही नाही याची जाणीव अडाणींचे बोर्ड करतात. आणि या परिस्थितीला Bjp भाजप जसे जबाबदार आहे तसेच किंवा त्याही पेक्षा जास्त जबाबदार आपले सांपत्तिक अस्तित्व टिकवण्यासाठी त्या पक्षात प्रवेश करुन किंवा पक्षाला पाठिंबा देत असलेले स्वतःला पुरोगामी म्हणवणारे राष्ट्रवादी कॉंग्रेससारखे पक्ष.
शेतकऱ्यांबद्दल हीनतेने बोलणारे, कार्यकर्त्यांना गप्प करणारे, पैशांच्या जोरावर मुलाला सहज पाठीशी घालणाऱ्या अजित पवारांबद्दल आदर फार पूर्वी मावळला. सुप्रिया सुळे गेली काही वर्षे त्यांच्या महाराष्ट्रवादी भूमिकेशी विसंगत विधाने करत आहेत. चांगल्या संसदपटू म्हणून काम करत असताना आपल्या पक्षाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल त्यांना थोडाही खेद वाटत नाही हे बघून सगळ्या महाराष्ट्राला खेद वाटतोय.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये समतावादी परिषदा सुरू असतानाच तिकडे अडाणींबरोबर चूल मांडायची. महाराष्ट्रातले सगळे समतावादी लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, समाजसुधारक अजूनही पवार कुटुंबाच्या ऑरामध्ये आहेत अशा समजात पवार कुटुंब असावे. याच काळात काही लेखकांनी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपला नम्रपणे रामराम केला ही बातमी अतिशय महत्वाची आहे. सत्ताधारी पक्षाला, सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाला विरोध ही आपली परंपरा आहेच पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही आहोत असा समज निर्माण करुन सत्ताधाऱ्यांना शरण जाणाऱ्यांना विरोधकांना विरोध करणारे हे लेखक आहेत. मुकुंद कुळे, प्रमोद मुनघाटे, गणेश विसपुते, नितिन रिंढे, राजीव नाईक, किरण येले, रणधीर शिंदे, चंद्रशेखर फणसळकर, शरद नावरे तुमचा खूप अभिमान वाटतो.
(साभार -सदर पोस्ट भक्ती चपळगावकर यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)