वाचवा, गराडीवृक्ष धोक्यात आलं आहे?
गराडी वृक्ष तुम्हाला माहिती आहे का? या झाडाचे महत्त्व काय? झपाट्याने सुरु असलेल्या औद्योगिकरणामुळे हे झाड धोक्यात आलं आहे का? गराडीवृक्ष प्रजातीच्या झाडांचे संवर्धन करणे का गरजेचं आहे? वाचा चिन्ना महाका यांच्या वनवैभवाच्या नोंदी-२ मध्ये...
जोहार !
वनवैभवाच्या नोंदी - २
गराडी (ओडसा मर्रा) हा वृक्ष परिसरात सगळ्याच ठिकाणी पाहायला मिळते. गराडी झाडाला मानवी जीवनात अतिशय मोलाचे स्थान आहे. या वृक्षाची उंची मध्यम असून पाने वर्तुळाकार असतात. हे झाड अतिशय विषारी आहे. शेतातील पिकांवर पांढरा करपा, लाल करपा असे रोग लागल्यास आदिम समाजात अनेक वर्षांपासून या झाडाच्या पानांचा अर्क शेतकरी फवारणीसाठी वापरतात. या झाडाची पाने सडवली जाते व त्याचा अर्क पिकांवरील कोणत्याही रोगांवर शिंपडल्यास त्यांचा सकारात्मक परिणाम दिसतो. या झाडाचे खोड, मूळ देखील विषारी आहे. यापासून काढलेला रस किंवा अर्क नदी-नाल्यातील पाण्यात टाकल्यास मच्छींना नशा येते. आदिम समाज याचा अशाप्रकारे मासे पकडण्यासाठी देखील उपयोग करतात. या झाडाच्या लाकडाचा वापर घर-इमारत बांधकामासाठी केल्यास अनेक वर्ष या लाकडास उधळी लागत नाही. हे टिकावू व मजबूत झाड आहे. गराडीचे लाकूड जडावू म्हणून देखील आदिम परिसरात मोठ्या प्रमाणात वापर केला करण्यात येतो. वनजमीन अतिक्रमण, वृक्षतोड, औदयोगिकरणामुळे या झाडाची प्रजाती सध्याच्या काळात धोक्यात असल्याचे दिसते. या महत्त्वपुर्ण वृक्षाचे संवर्धन व व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे.
- चिन्ना महाका, हेमलकसा