Indian Constitution Preamble Chart म्हणजे जगण्याचा मार्ग !

जितक्या लोकांना संविधान उद्देशिकाची माहिती असेल तितके संविधान मजबूत होईल. उद्देशिकातील शब्द आणि दैनंदिन आयुष्य या नवीन संकल्पनेतून संविधान उद्देशिका तक्ता नेमका काय आहे जाणून घ्या मनीष देशपांडे यांच्याकडून

Update: 2025-12-17 11:27 GMT

26 जानेवारी 2025 रोजी आपली राज्यघटना Indian Constitution लागू होऊन 75 वर्षे पूर्ण होत असून सर्वांना संविधान प्रचारक लोकचळवळ कडून मनपूर्वक शुभेच्छा. या 75 वर्षात अनेक चढउतार आले पण संविधानाने नेहमीच भारतीय जनतेच्या हक्कांचे रक्षण केले. जितक्या लोकांना Indian Constitution Preamble संविधान उद्देशिकाची माहिती असेल तितके संविधान मजबूत होईल. त्यामुळेच लोकांना संविधानिक मूल्यांची जाणीव व्हावी आणि लोकांचा संविधानावरील विश्वास वाढावा या उद्देशाने 26 जानेवारी 2023 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने आदेश दिले होते.

संविधानातील मूलभूत संरचनेमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही, न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार हा न्यायालयाकडे कायम असेल असा ऐतिहासिक निकाल केशवानंद भारती खटल्यामध्ये देण्यात आला होता. 24 एप्रिल 1973 रोजी केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्याचा निकाल लागला आणि आजतागायत तो निकाल देशासाठी मार्गदर्शक आहे. संसद जरी सर्वोच्च असली तरी सर्वशक्तीमान संसदेला संविधानातील मूलभूत संरचनेमध्ये म्हणजे बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल करता येणार नाही असा निर्णय न्यायालयाने दिला. त्या नुसार भारतीय संविधान उद्देशिकामध्ये असलेले मूल्य प्रचार प्रसार केला जात आहे. हे मूल्य सोप्या भाषेत समजावे म्हणून हा सोपा तक्ता केला गेला आहे.

या तक्त्यामध्ये (चार्ट) संविधान उद्देशिकांमधील प्रत्येक शब्द याचे सर्वसामान्यांना तसेच तरुण - लहान विद्यार्थ्यांना सुद्धा कळावे म्हणून सोप्या भाषेत त्याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहिला गेला आहे. यामध्ये भारतीय संविधान उद्देशिकाचे पाच भाग केले असून “पहिला भाग” आम्ही भारताचे लोक, “दुसरा भाग” भारत कसा घडवावा ? या मध्ये भारताचे एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, “तिसरा भाग” भारतीय नागरिकांना काय मिळणार ? या मध्ये त्याच्या समस्त नागरिकांस : सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य ;दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा “चौथा भाग” भारतीय नागरिकांची जबाबदारी काय ? या यामध्ये सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा, संकल्पपूर्वक निर्धार करून संविधान अंगीकृत आणि स्वतः प्रत अर्पण करीत आहोत आणि “पाचवा भाग” सरकारची जबाबदारी काय ? या यामध्ये आपल्या या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अधिनियमीत करत आहोत. असे समजेल असे विभाजन केले आहे. या भागामध्ये अंतर्गत असणारे सर्व उपविभाग याचे सुद्धा विश्लेषण करण्यात आले आहे.

भारतीय संविधान उद्देशिका काही जण त्याला प्रस्ताविका म्हणतात तर काहीजण सरनामा म्हणतात. ही उद्देशिका सरकारी कार्यालयातील प्रवेशद्वारावरच दिसून येते. शाळा - कॉलेज येथे सुद्धा ती प्रवेशद्वारावर दर्शनीय ठिकाणी दिसून येते. पुस्तकांमध्ये प्रथम पानावरच असते, त्याविषयी धडे सुद्धा पाठ्यपुस्तकात आहेत व शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून रोज म्हणून सुद्धा घेतली जाते.

संविधान तक्ता संकल्पना ?

परंतु सरकारी अधिकारी, कर्मचारी, कॉलेजमधील विद्यार्थी, शाळेमधील विद्यार्थी तसेच इतर नागरिकांना भारतीय संविधान उद्देशिकांमधील शब्द, त्याचा सोप्या भाषेत अर्थ व या शब्दाला किती महत्त्व आहे हे माहीत नसते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे शब्द जबाबदारीनुसार कसे जोडता येईल व त्याचबरोबर याचे महत्व सामान्य नागरिकांपर्यंत कसे पोहचवता येईल यासाठी एस.एम.एस. सी फाउंडेशन (सोशल मुमेंट सपोर्ट सेंटर) प्रयत्नशील आहे.

उद्देशिकेचा नेमका अर्थ सांगणारा आणि कमी पैशात विकत घेता यावे असा चार्ट तयार करावे अशी संकल्पना एस.एम.एस.सी फाउंडेशन चे डायरेक्टर मनिष देशपांडे यांना आली. ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतार्थ शेवगावकर यांनी पुढाकार घेऊन त्याची निर्मिती चालू केली. सुनीती. सु.र, रोहिणी पेठे, सिद्धेश रत्नमाला मदन, ॲड.निलेश खानविलकर, नागेश जाधव, प्रवीण जठार, ॲड. तृणाल टोणपे, ॲड.निकिता आनंदाचे यांचे मार्गदर्शन घेऊन हा तक्ता पूर्ण केली. हा तक्ता लवकरात लवकर प्रकाशित व्हावे या हेतूने साहित्य विश्‍व प्रकाशनचे संपादक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी सहकार्य केले व तात्काळ प्रकाशन करून दिले. या तक्त्यामध्ये वुई. दि. पीपल अभियान संस्थेचे बुकलेट व जगण्याचा मार्ग संविधान उद्देशिका हे पुस्तक याचे संदर्भ घेतले असून या तक्त्यासाठी सहयोग "समता फिलोशीप" कोरो इंडिया व प्रा.नीलम पंडित यांचे लाभले. या तक्त्याचे सादरकर्ते व सर्व हक्क एस.एम.एस.सी फाउंडेशन (सोशल मोमेंट सपोर्ट सेंटर) आहेत.



याचे प्रकाशन बार्शी येथे "संविधान परिषद" या कार्यक्रमांमध्ये बार्शी मधील सर्व संविधान प्रेमी संस्था संघटना व्यक्ती यांनी एकत्र मिळून केलेल्या परिषदेमध्ये कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्या हस्ते झाले. संविधान परिषद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. काकासाहेब गुंड तसेच संविधानाच्या मूल्यानुसार जनसामान्यांच्या समस्या सोडवणारे सर्वास जास्त मताने निवडून आलेले धाराशिव चे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकाशन कार्यक्रमाला आवर्जून आले असून त्यांना सुद्धा हा तक्ता जनसामान्यात देण्यासाठी भेट देण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व संविधान प्रेमी यांनी पाठपुरावा केला त्यामूळे हा तक्ता प्रकाशित होत आहे. हा तक्ता सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन जीवनात संविधान आणि संविधान उद्देशिका आणण्यासाठी सर्व संस्था, संघटना, समन्वय, कार्यकर्ते, विद्यार्थी, शाळा, कॉलेजेस, सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय व्यक्ती - पक्ष व संविधान प्रेमी या सर्वांना उपयोगात येईल असा तक्ता असून दर्शनी भागात लावण्यासारखा हा तक्ता आहे.

विशेष म्हणजे हा तक्ता लोकशाही स्वरूपानुसार असून अनेक संविधान अभ्यासक आणि तज्ज्ञ यांच्या सहकार्याने एकत्र येऊन विचार विनिमय करून हा तक्ता सर्वानुमते लिहिलला आहे.


मनीष रवींद्र देशपांडे

मोबाईल नंबर - 9921945286

सोबत तक्ता फोटो व माझा फोटो

Similar News