Review of 2025 Year : सत्तेच्या सावलीखाली खुंटत चाललेला विवेक!

गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक घटनांनी वेळोवेळी लोकांचे मुखवटे गळून पडले आणि खरे चेहरे समोर आलेत. फक्त कलाकारच नाही तर काही पत्रकार व राजकारणी ही या यादीत आपली जागा निर्माण करू शकले आहेत. 2025मध्ये या यादीत जागा बनवू शकलेल्यांची उजळणी करतायेत सामाजिक आणि राजकीय रचनेत दडलेल्या विषमतांकडे लक्ष वेधणाऱ्या मोनिका नामे वाचा

Update: 2025-12-27 00:52 GMT

Indian Cricket, Cinema भारतात क्रिकेट आणि सिनेमा यांना Religion and Politics धर्म व राजकारणाइतकेच महत्त्व दिले जाते. या चारही घटकांची सरमिसळ नेहमीच दिसून येते. क्रिकेट आणि त्यातील political interference राजकीय हस्तक्षेप यावर वर्षभर पुरेसं बोललं गेलं आहे, त्यामुळे आज मुद्दाम सिनेमाकडे वळायचं ठरवलं आहे. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांमुळे, आणि विशेषतः त्यात सहभागी असलेल्या काही कलाकारांमुळे मन कुठेतरी अस्वस्थ झालं. याआधी Anupam Kher, Paresh Rawal, Satish Shah, Ranvir Shorey, and Randeep Hooda अनुपम खेर, परेश रावल, सतीश शाह, रणवीर शौरी, रणदीप हुडा यांसारख्या कलाकारांच्या बदललेल्या भूमिका किंवा त्यांनी पडद्याबाहेर स्वीकारलेल्या भूमिकांमुळे निराशा वाटली होती. यावर्षी त्या यादीत आणखी काही नावांची भर पडली. आणि फक्त कलाकारच नाही तर काही journalists पत्रकार व राजकारणी ही या यादीत आपली जागा निर्माण करू शकले आहेत. वर्षभरातील या यादीत जागा बनवू शकलेल्यांची ही उजळणी.

आपल्या पंतप्रधानांच्या एका भाषणातून आलेली एक ओळ बरीच गाजली आहे - “हिपोक्रसी की भी सीमा होती है.” hypocrisy

खरं तर ही ओळ आपल्या तथाकथित विश्वगुरूंच्याच नावावर कॉपीराइटने नोंदवायला हवी. पण मन मोठं असल्यामुळे त्यांनी ती सर्वांसाठी खुली ठेवली आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! पण याच वर्षी पुन्हा एकदा असं जाणवलं की ढोंगीपणाला प्रत्यक्षात कुठलीही मर्यादा नसते. कलाकार असोत, राजकारणी असोत किंवा इतर प्रभावशाली मंडळी, दरवर्षीप्रमाणे यंदाही याची प्रचीती आली.

गेल्या दहा वर्षांत राजकारणामुळे समाजात जेवढी फूट पडली आहे, ती देशाच्या फाळणीच्या काळातही इतकी तीव्र नव्हती, असं RJD चे नेते प्रा. मनोज कुमार झा सांगतात आणि या मताशी पूर्णपणे सहमत व्हावंसं वाटतं. टोकाच्या राजकीय भूमिकांमुळे लोकांची नाती तुटत चालली आहेत, मैत्री दुरावत आहे. कोणाला पाठिंबा देतोस, कोण आवडतं किंवा नकोसं वाटतं, यावरूनच माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत. अशा विषारी वातावरणात स्वतःच्या विचारांवर ठाम राहणं अनेकांना अवघड होत चाललं आहे. जे कधी काळी धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक न्याय यांचे ठाम समर्थक होते, तेच आज सत्तेच्या जवळ, सत्ताधाऱ्यांच्या मैत्रांसोबत उभे दिसतात आणि ते पाहून मन कुठेतरी खंतावून जातं.

गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक घटनांनी वेळोवेळी लोकांचे मुखवटे गळून पडले आणि खरे चेहरे समोर आलेत. अशी उदाहरणं कमी नाहीत. सुरुवात करायची तर ‘दिल्ली क्राइम’मुळे नव्याने फेमस झालेली actress Shefali Shahअभिनेत्री शेफाली शहा. थ्री ऑफ अस, डार्लिंग्स आणि दिल्ली क्राइमचे तीनही सिझन करणारी ही अभिनेत्री, जेव्हा तिचा दिग्दर्शक-निर्माता पती ‘केरला स्टोरी’सारखा चित्रपट बनवतो, तेव्हा त्या सिनेमाचा प्रचार ती आपल्या सोशल मीडियावर अगदी निर्धास्तपणे करताना दिसते.


तिच गत हिंदी सिनेमाची दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका पदुकोणची, सिनेमाच्या प्रमोशनसाठी म्हणा की खरंच सपोर्ट म्हणून, JNU च्या प्रदर्शनात सहभागी होणारी ही नवऱ्याच्या ‘धुरंधर’ ची पब्लिसीटी करतेच. नमीत दास, झाकिर हुसैन आणि ब्रिजेंद्र काला यांसारखे दर्जेदार कलाकार ‘द ताज स्टोरी’ मध्ये झळकतात, तर विजय राजसारखा अनुभवी अभिनेता ‘उदयपूर फाइल्स’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसतो. मात्र या कलाकारांवर थेट दोष ठेवावासा वाटत नाही. कदाचित या भूमिका स्वीकारण्यामागे काही अपरिहार्य परिस्थिती असाव्यात, अशी समजूत मनाला घालते.

खऱ्या अर्थाने धक्का देणाऱ्या आणि मनाला बोचणाऱ्या ‘धुरंधरां’मध्ये सगळ्यात पुढे नाव घ्यावं लागेल ते actor Vikrant Massey अभिनेता विक्रांत मास्सीचं. रील आणि रिअल लाईफ दोन्हींतला त्याचा वावर कधीकाळी प्रशंसनीय वाटायचा. सम्दिश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपलं घर सर्वधर्मसमभावाचं जिवंत उदाहरण कसं आहे, हे अभिमानानं सांगितलं होतं. डेथ ऑफ द गंज, छपाक, लिपस्टिक अंडर माय बुरखा, लूटेरा आणि या मालिकेतील शेवटचा 12th फेल, हे त्याचे चित्रपट त्याच प्रतिमेला साजेसे होते.


मात्र यानंतर त्याच्या चित्रपट निवडीत आणि विचारसरणीत झालेला पूर्ण ३६० अंशांचा बदल चकित करणारा आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ पासून या प्रवासाला सुरुवात झाली. त्या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या त्याच्या मुलाखती ऐकल्या की, सर्वधर्मसमभावाची भाषा करणारा हा तोच माणूस आहे का, असा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे या चित्रपटाचा खास शो पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. आता पुढच्या चित्रपटात तो श्री. श्री. रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय, पंतप्रधानांच्या पंच्याहत्तरीनिमित्त तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ गाण्यातही त्याची उपस्थिती लक्षात राहण्यासारखी आहे.

त्या गाण्यापुरतंच बोलायचं झालं, तर वरुण धवन, अर्शद वारसी आणि विक्रांत मास्सीसोबत दिसलेला आणखी एक परिचित चेहरा म्हणजे राजकुमार राव. अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा, संवेदनशील कलाकार म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता अशा उघड प्रचारकी गाण्यात सहभागी होतो, हे पाहणं मनाला अस्वस्थ करून जातं.

आणखी एक खोलवर टोचणारा धक्का म्हणजे लेखक, कवी आणि अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानव कौलचा सहभाग आदित्य धरच्या निर्मितीतील ‘बारामुल्ला’ या चित्रपटात.


चित्रपटात दिसणाऱ्या सूक्ष्म इस्लामोफोबियाबद्दल न्यूजलॉन्ड्रीचे अतुल चौरसिया यांनी जेव्हा अत्यंत नेमकेपणाने प्रश्न विचारले, तेव्हा मानव कौलने “मला माहिती नाही” असं म्हणत आपण तो सिनेमा अजून पाहिलाच नाही, अशी कारणं दिली. ही स्पष्टीकरणं कुठेच पटणारी नव्हती. यावर्षी एका संवेदनशील कलाकाराकडून अशी भूमिका पाहून मन निराश झालं.

कलाकारांसोबत काही पत्रकारही दिसले यावर्षी कोलांट्या उड्या मारताना. गोदी पत्रकारांची तशीही काही कमतरता नाहीच पण बरखा दत्त व ‘आय एम अ ट्रोल’ लिहून भाजपा आयटी सेल व ट्रोल्सना उघडं पाडणाऱ्या स्वाती चतुर्वेदी ताई जरा कन्फ्यूज दिसल्या त्यांच्या एकंदर मीडिया-सोशल मीडियातील वावरातून.

चतुर्वेदी वरून आठवलं आपले राजकारणी कसे मागे रहातील या सगळ्यात. प्रियंका चतुर्वेदी, राघव चड्डा यांच्याबद्दल वावड्या उडत राहिल्या वर्षभर त्यांच्या भाजपात सामील होण्याविषयी. आणि शशीतर थरूर यांचा दोन दगडांवरील थरार सुरूच आहे, येणारा काळ- वर्ष ठरवेल त्यांच्या प्रवासाची दिशा व दशा.


वर्ष संपत आलं तसं थंडीचा जोर वाढला आणि देशभरात लग्नसराईचं वातावरण सुरू झालं. उद्योगपती आणि भाजप नेते नवीन जिंदाल यांच्या कन्या यशस्विनी जिंदाल यांच्या विवाहसोहळ्यात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. TMC नेत्या महुआ मोईत्रा आणि NCP (SP) च्या सुप्रिया सुळे या मंचावर भाजपाच्या खासदार, ‘राईट विंग शेरनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौतसोबत नाचताना दिसल्या. या प्रसंगावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, ज्याला महुआ मोईत्रांनी आपल्या नेहमीच्या धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिलं.


त्यांचं म्हणणं होतं की राजकारणामुळे वैयक्तिक नाती, मैत्री तोडली जाऊ नये, हे म्हणणं तत्वतः मान्य करता येईल. मात्र एवढंच लक्षात घ्यायला हवं की, याच राजकीय परिस्थितीला आणि या फॅशिस्ट प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी असंख्य सामान्य नागरिकांनी आपली मैत्री, नातेसंबंध, नोकरी, व्यवसाय तर सोडाच, प्रसंगी जीवही धोक्यात घातला आहे. ही जाणीव प्रत्येक राजकारणी आणि सेलिब्रिटीने ठेवणं तितकंच गरजेचं आहे. संघर्ष कठीण आहे, पण तो अशक्य नक्कीच नाही.

प्रभावशाली व्यक्तींनी सत्य आणि मूल्यांची पायाभरणी करत समाजाच्या हितासाठी प्रामाणिकपणे उभे राहणे गरजेचे आहे. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणतात तसं, सत्तेच्या वळचणीला उभं रहाणं सोपं असतं. लाचारांच्या फौजेत सामील होणंही कठीण नसतं. फक्त विवेकाचा गळा घोटावा लागतो!

Similar News