सैनिकांचे कपडे घालून सैनिकांविषयी आदर सिद्ध होतो का?

एक दिया सैनिको के नाम... अशा घोषणा देऊन, सैनिकांसोबत दिवाळी साजरी करुन, सैनिकांचे कपडे घालून, पोझ वगैरे देऊन फोटो काढून सैनिकांविषयी आदर वाढतो का? फेब्रुवारी मध्ये कॅगने याच सैनिकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्याचं म्हटलं आहे... पंतप्रधान याकडे कधी लक्ष देणार... हीच खरी देशभक्ती आहे का? वाचा आनंद शितोळे यांचा लेख...

Update: 2020-11-17 02:25 GMT

सैनिकांचे कपडे घालून, पोझ वगैरे देऊन फोटो काढून घेऊन, सैनिकांच्या साठी दिवे लावा. वैगरे भावनिक आवाहन करून सैनिकांच्या बद्दल असलेल प्रेम दाखवता येतं. मात्र, ते दाखवणे पुरेसं नसतं. सैनिकांच्या विषयी असलेला आदर दाखवणे पुरेस नाही. तर तो कृतीतून सिद्ध झाला पाहिजे.

फेब्रुवारी २०२० मध्ये आलेल्या कॅग च्या रिपोर्टच्या या ठिकाणी पुन्हा आठवण करून देतोय. कॅगच्या रिपोर्ट मध्ये मुद्दे काय होते ?

सियाचीन आणि त्यासारख्या दुर्गम भागातल्या सीमावर्ती भागात विशेषतः बर्फाळ भागात कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या गरजा विशिष्ट असतात. मागच्या चार वर्षात कपडे, बूट, जाकीट, स्नोगॉगल्स, थंडी पासून बचाव करणारे मास्क यांचा पुरवठा पुरेसा नाहीये.

स्नोगोगल्सचा पुरवठा ६२ ते ८२ टक्के कमी आहे.

बर्फाळ भागात काम करताना उर्जा टिकवून ठेवायला अन्न सकस आणि जास्तीच्या कॅलरी असलेलं लागतं. मात्र, प्रत्यक्षात पुरवल्या जाणाऱ्या अन्नात गरजेच्या फक्त २० टक्के कॅलरी असलेलं अन्न तेही अनियमितपणे दिलेलं आहे.

पुरवलेले मास्क, कपडे, बूट, जाकीट आवश्यक त्या दर्जाचे नाहीत.

या हिमनदीच्या भागातल्या जवानांच्या कुटुंबासाठी घरबांधणी प्रकल्प जाहीर केला गेला. मात्र, त्या बद्दल सगळ्याच पाळतीवर अनास्था आहे.

या दिरंगाई आणि अनियमितपणाची चौकशी करून संबंधितांना कडक शिक्षा कारवाई करावी. अशी शिफारस कॅग ने केलेली आहे.

फेब्रुवारी २०२० ते नोव्हेंबर २०२०

प्रश्न.

अशी चौकशी आणि कारवाई झालीय का ?

कॅग ने नोंदवलेले आक्षेप स्विकारून पुरवठा वाढवलेला आहे का? किंवा दर्जा सुधारलेला आहे का?

सरकारच्या भाटांनी या प्रश्नाची उत्तर देणे अपेक्षित आहे.

आणि हो, कॅग देशद्रोही आहे. वैगरे नेहमीच्या गप्पा मारून भागणार नाही.

सैनिकांच्या विषयी असलेला आदर दाखवणे पुरेस नाही. तर तो कृतीतून सिद्ध झाला पाहिजे.

Tags:    

Similar News