MNREGA and Poverty Reduction : मनरेगा अस्तित्वात नसती तर गेल्या 20 वर्षात शहरांच्या बकालीकरणाचा वाढला असता वेग!
डिमोनेटेझेशन आणि कोरोना काळात तर मनरेगा योजनेमुळे कोट्यवधी कुटुंबे तगून राहू शकली होती. गंभीर नैसर्गिक अरिष्टात संपूर्ण संसार उध्वस्त होत असतात. अशा सर्व प्रसंगी कोट्यावधी माणसांना जगवण्याचे मोठे काम मनरेगाने केले होते. त्याचे रुपयातील मूल्य किती? - संजीव चांदोरकर, अर्थतज्ज्ञ
MNREGA Scheme मनरेगा फक्त हक्क आधारित rural employment guarantee scheme ग्रामीण रोजगार हमी योजना नव्हती तर बरेच काही होती.
मनरेगा कोणा नोकरशहाच्या किंवा राजकीय नेत्याच्या डोक्यातून आलेली योजना नव्हती तर जनकेंद्री विचारधारा मानणाऱ्या प्रोफेशनल्स आणि कार्यकर्त्यांच्या मांडणीतून साकारली होती. UPA government २००४ सालात यूपीए सरकारने कार्यरत केलेल्या National Advisory Council “नॅशनल आडवायजरी कौन्सिल (NAC)” त्याची ढकलशक्ती होती. येथे लोकशाहीतील सक्रिय सिव्हिल सोसायटीचे महत्व अधोरेखित होते. मनरेगाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर कडवी टीकाकार असणाऱ्या जागतिक बँकेने देखील आपले मत बदलून त्या योजनेच्या भारतासारख्या गरीब देशातील उपयुक्ततेबद्दल प्रशंसा केली होती. कारण या योजनेचे लाभार्थी प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्य, स्त्रिया, अल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर, कारागीर असे अनेक वंचित समाज घटक राहिले आहेत. त्याचे रुपयातील मूल्य किती? marginalized sections of society, including Scheduled Castes, Scheduled Tribes, minorities, women, small farmers, agricultural laborers, and artisans.
योजना सुरू झाल्यापासून एकूण ३५० कोटी मानवी दिवसांचा रोजगार तयार केला गेला. ज्या मधून जमीन सपाटीकरण, शेती साठी काही पुरक कामे, छोटी तळी, जोडरस्ते असे सहा कोटींपेक्षा जास्त ॲसेट तयार झाले. त्याचे रुपयातील मूल्य किती? शेती नसतांना, ज्यावेळी ग्रामीण भागात लोकांच्या हाताला काम नसते, नक्की कोठून जगण्यासाठी लागणारे किमान उत्पन्न मिळवायचे हे माहित नसते, अशा टिपिकली फेब्रुवारी जून पर्यंतच्या काळात मनरेगा योजनेने कोट्यावधी दिवसांचे रोजगार मिळवून दिले. त्यामुळे मनरेगा शेती क्षेत्राला स्पर्धक नाही तर पूरक सिद्ध होत होती.. त्याचे रुपयातील मूल्य किती?
कोट्यावधी कुटुंबाची अर्धिमुर्धी क्रयशक्ती त्यातून तयार झाली. दारिद्र्याची धार बोथट झाली. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची संख्या त्या भागात वाढली, खाजगी सावकारांवरचे अवलंबित्व कमी झाले. त्याचे रुपयातील मूल्य किती?
ग्रामीण भागात टोकाच्या वंचितावस्थेमुळे लोक, शहरात जाऊन नक्की काय करणार हे त्यांना स्पष्ट नसताना देखील मिळेल त्या वाहनाने शहरात येऊन थडकतात. त्याचा संबंध शहरातील झोपड्या वाढणे, बकालीकरण वाढण्याशी आहे. हे कॉमन सेन्सिकल आहे. मनरेगा अस्तित्वात आलीच नसती तर गेल्या वीस वर्षात या शहरांच्या बकालीकरणाचा वेग अजून वाढला असता. मनरेगामुळे तो कमी राखला गेला. त्याचे रुपयातील मूल्य किती? या एका कारणासाठी शहरी मध्यमवर्ग मनरेगाचा पाठीराखा असावयास हवा.
demonetization and COVID-19 pandemic डिमोनेटेझेशन आणि कोरोना काळात तर मनरेगा योजनेमुळे कोट्यवधी कुटुंबे तगून राहू शकली होती. गंभीर नैसर्गिक अरिष्टात संपूर्ण संसार उध्वस्त होत असतात. अशा सर्व प्रसंगी कोट्यावधी माणसांना जगवण्याचे मोठे काम मनरेगाने केले होते. त्याचे रुपयातील मूल्य किती?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या हाताने काम करून, चार पैसे कमवून त्यावर जमेल तसा उदरनिर्वाह करण्यातून माणसांचा आत्मसन्मान तेवत राहू शकतो. त्याचे रुपयातील मूल्य किती? नवाउदरमतवादाला फक्त “रिटर्न ऑन कॉर्पोरेट कॅपिटल”ची भाषा कळते. दुसरी कोणतीही नाही. गुडघ्यात मेंदू असणारे , हृदय नसणारे लोक आहेत ते
संजीव चांदोरकर
(अर्थतज्ज्ञ)