Christian Literature : 'नाताळ' शब्द आणि कशी झाली नाताळ विशेषांकांची सुरुवात
पोर्तुगिजांमुळे 'नाताळ' शब्दाची निर्मिती झाली का? नाताळ विशेषांकांची सुरुवात कधी झाली ? वाचा लेखक कामिल पारखे यांचा लेख
Christmas, Natal ख्रिसमस अर्थात नाताळ. ख्रिस्तजन्माच्या या सणाला Marathi मराठीत नाताळ हा Word शब्द रुढ झाला तो शेजारच्या Goa गोव्यात तब्बल साडेचारशे वर्षे ठाण मांडून बसलेल्या फिरंगी Portuguese पोर्तुगिजांमुळे. अनेक युरोपियन भाषांत वापरल्या जाणाऱ्या नाताळ या शब्दाचे मूळ `Natalis' मात्र लॅटिन आहे.
European languages, Latin roots लॅटिन, पोर्तुगीज आणि इतर युरोपियन भाषांत आपल्या मराठीत आणि दक्षिण भारतीय भाषांत आढळणाऱ्या `ळ' या उच्चाराचे अक्षर आहे कि नाही हे मला माहित नाही. मात्र पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत अवतार घेताना Natal या शब्दाने `नाताल' न होता मराठमोळे `नाताळ' रूप घेतले हे गमतीदार आहे.
मात्र मला `नाताळ' या शब्दाच्या व्युत्पत्तीशास्त्रात शिरायचे नाही. नाताळाला एक महिना असताना ख्रिसमस विशेषांकांची लगबग सुरु झाली होती. यावेळी सातआठ दिवाळी अंकांत माझे लेख होते. त्यापैकी तीनचार जणांनी बऱ्यापैकी मानधन दिले, एकाने फक्त दिवाळी अंक घरपोच आणून दिला तर इतर दोन जणांनी दिवाळी अंक पोस्टाने पाठविण्याचीसुद्धा तसदी घेतली नाही. त्या अंकात माझा लेख छापून आला हे एका तिऱ्हाईताने फोन केल्याने कळाले. नाताळ विशेषांक पुण्यातून नियमितपणे प्रकाशित करणाऱ्या दयानंद ठोंबरे यांनी आपल्या `अलौकिक परीवार' या विशेषांकाच्या प्रकाशन सोहोळ्याला ९ डिसेंबरचा मुहूर्त शोधला.
मात्र त्याआधीच सव्वाशे वर्षे जुन्या (स्थापना एप्रिल १९०३) असलेल्या `निरोप्या' मासिकाचा नाताळ विशेषांक वर्गणीदारांना दोन-तीन डिसेंबरच्या दरम्यान घरपोच मिळणार आहे. त्याशिवाय पिंपरी चिंचवडचे फ्रान्सिस गजभिव हे `शब्द' नाताळ विशेषांक काढत असतात. गेली काही वर्षे वसईतून ख्रिस्तोफर रिबेलो 'ख्रिस्तायन' हा ख्रिसमस विशेषांक ऑनलाईन प्रकाशित करत आहेत. त्याशिवाय इतरही अनेक जण ख्रिसमस विशेषांक प्रकाशित करत असतात.
ख्रिसमस अंक प्रकाशित करणाऱ्यांमध्ये हौशे, नवसे आणि गवसेही असतात. प्रत्येक छापील दिवाळी अंकाची आर्थिक उलाढाल तीन ते पाच लाख रुपयांच्या आसपास असते असे म्हणतात. बहुतांश ख्रिसमस विशेषांकांच्या बाबतीतसुद्धा असेच आहे.
माझ्या माहितीनुसार `निरोप्या' मासिकाचे Christmas Magazines पहिले भारतीय संपादक फादर प्रभुधर यांनी १९७५ साली नाताळ विशेषांकांची परंपरा सुरु केली. त्यावेळी श्रीरामपुरात दहावीत शिकत असलेल्या माझा एक अर्धा पानभर लेख या अंकात आहे.
`निरोप्या'च्या त्या नाताळ विशेषांकाचे खाली दिलेले खास भारतीय शैलीतले मारियाबाई आणि बाळ येशुचे चित्र असलेले हे कव्हर होते. चित्रकार कोण असेल बरे? बहुधा अँजेला त्रिन्दाद.