Suresh Kalmadi passes away: ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन

Update: 2026-01-06 04:39 GMT

Suresh Kalmadi passes away ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि Indian Olympic Associationभारतीय ऑलिंपिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कलमाडी यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. कलमाडी यांचे पार्थिव दुपारी २ वाजेपर्यंत एरंडवणे येथील त्यांच्या 'कलमाडी हाऊस' या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सुरेश कलमाडी यांनी पुण्याचे तीन वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. ते रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या कलमाडी यांनी राजकारण आणि क्रीडा प्रशासनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. २०१० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात त्यांची प्रमुख भूमिका होती, ज्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले. कलमाडी यांच्या निधनाने राजकारण आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने पुणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे.

Similar News