एकनाथ शिंदेंच्या मदतीशिवाय मुंबईत भाजपचा महापौर होणं अशक्य !
It is impossible for BJP to become the mayor of Mumbai without the help of Eknath Shinde!
राज्यात २९ महापालिकांचा निकाल लागला. त्यात मुंबईसह बहुतांश महापालिकांमध्ये भाजपाने वर्चस्व सिध्द केलं. या संपुर्ण रणधुमाळीत सर्वांचं लक्ष देशातील सर्वात श्रीमंत महापलिका म्हणजेच मुंबई महापालिकेकडे लागून होतं. या महापालिकेच्या निवडणुक निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजपाला महापौर करणं अवघड जात आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या मदतीशिवाय भाजपचा महापौर होणं अशक्य आहे.
मुंबईच्या महापौरपदावर भाजपचा नगरसेवक बसवण्यासाठी त्यांना २५ नगरसेवकांची गरज आहे, तर शिवसेनेकडे २९ नगरसेवक आहेत. भाजपाला ८९ तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेत निवडुन आलेल्या २९ नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांनी हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. याठिकाणी शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळं पुढचे काही दिवस या नगरसेवकांना हॉटेलमध्येच मुक्काम कारावा लागणार आहे. शिवसेनेचे 29 नगरसेवक सध्या मुंबईतील वांद्रे इथल्या हॉटेल ताज लँड्स एंड येथे मुक्कामी आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत संख्याबळाचा फायदा असला, तरी सत्तावाटपाबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळं मुंबईतील निवडणूक-पश्चात राजकीय हालचाली अजूनही थांबलेल्या नाहीत. शिंदे गटाने शनिवारी आपल्या नवनिर्वाचित २९ नगरसेवकांना वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले, ज्यामुळे शहरातील सत्तावर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. २२७ सदस्यांच्या सभागृहात ८९ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी स्वबळावर महापौर निवडून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या ११४ च्या आकड्यापर्यंत तो पोहोचू शकलेला नाही. बहुमतासाठी भाजपला शिवसेनेवर अवलंबून राहावे लागत आहे. भाजप-शिवसेना मिळून ११८ चं संख्याबळ आहे. मात्र, महापौरपद कुणाकडे जाणार आणि किती काळासाठी, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आता महापौरपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हॉटेलमध्ये नगरसेवकांना ठेवण्यामागील राजकीय अर्थ काढण्याचे फेटाळून लावत घोडेबाजार होणार नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईत महायुतीचा एकमताने ठरलेला महापौर असेल, असे त्यांनी सांगितले. मतभेद मिटतील असा विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे इतर नेते बसून महापौर कोण असेल आणि किती काळासाठी असेल, याचा संयुक्त निर्णय घेऊ. कोणतेही मतभेद राहणार नाहीत. सर्व काही सुरळीत पार पडेल आणि आम्ही मिळून मुंबईचा कारभार सक्षमपणे चालवू, असे फडणवीसांनी सांगितले. भाजपला मुंबई महापालिकेत महापौर बसवायचा असेल तर एकनाथ शिंदेंच्या मदतीनंच बसवावा लागणार आहे. त्यामुळेच ठाकरेंपेक्षा कमी असले तरी शिंदेंचे 29 नगरसेवक गेमचेंजर ठरणार आहेत.