Pune पुणे शहर आज एका निर्णायक टप्प्यावर उभं आहे. हवेचा दर्जा सातत्याने खालावत आहे, नद्या आणि टेकड्यांवर विकासाच्या नावाखाली प्रकल्प रेटले जात आहेत, आणि या सगळ्याच्या आड प्रदूषण व भ्रष्टाचार वाढतो आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पुण्याची दिल्ली होणार का? हा केवळ भीतीचा प्रश्न नाही, तर वास्तवाची जाणीव करून देणारा इशारा आहे. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,जागरूक पुणेकरांना नेमकं काय हवं आहे? विकास, पर्यावरण, पारदर्शकता की फक्त आश्वासनं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली आहेत मॅक्सवूमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी पुणेकर नागरिकांशी थेट संवाद साधून. हा व्हिडीओ म्हणजे केवळ चर्चा नाही, तो आहे पुण्याच्या भविष्यासाठीचा आरसा.