भाजपच का निवडून येतोय? यशोमती ठाकूर यांचा प्रश्न, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचं उत्तर

Update: 2025-11-18 02:25 GMT

(BJP) भाजपच का निवडून येतोय ? हा प्रश्न नकारात्मक आहे खरंतर यशोमतीताई तुमचा प्रश्न असा हवा की congress काँग्रेस का निवडून येत नाही? तर याच उत्तर माझ्याकडे आहे असं म्हणत ज्येष्ठ पत्रकार, संपादक उत्तम कांबळे सांगतात की,

1980 नंतर आपल्या देशामध्ये जी जातीय, धार्मिक समीकरणं बदलत गेली ती खूप वेगाने बदलत गेली आणि प्रत्येक जात एक political पॉलिटिकल बेटासारखी तयार होऊ लागली. कारण भारतामध्ये 5 हजार जाती आहेत. आणि 1980 सालापर्यंत 200 ते300 जातींच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती. 5 हजार जाती आहेत का राजकरणात ? 5 हजार जाती आहेत का सत्तेत? हे जे मोबिलाइजेशन (Mobilization) झालेलं आहे त्या मोबिलाइजेशनमध्ये काँग्रेसचा जो पारंपारिक असलेला Voter व्होटर म्हणजे जाती, काँग्रेसकडे पूर्वी जातीच होत्याना आणि प्रत्येक पक्षाकडे जातीच आहेत. काँग्रेसच्या पॉप्युलर जाती कोण दलित, मुस्लीम, आदिवासी आणि थोडाफार ओबीसी.

1980 नंतर याच काय झालं तर काँग्रेसकडून या जाती शिफ्ट का होत गेल्या आणि कुणी पकडलं या जातींना… अगदी Bihar बिहार निवडणुकांचं उदाहरण घ्यायच झालं तर लालू यादव यांच्या आरजेडी पक्षाकडे यादव आणि मुस्लीम होते. नीतिश कुमार यांच्याकडे उच्च दलित होते (उच्च दलित ही कॅटगरी त्यांनी तयार केली आहे ज्यामध्ये खालच्या पातळीवरील दलित) चिराग पासवान यांच्या पक्षाकडे दलित आणि मग उरला भाजप… भाजपाकडे ब्राम्हण, बनिया आणि थोडा ओबीसी आहे. अरे काँग्रेस के साथ कौन है भैया… हे जे ड्रॉप आऊट सुरु झालेलं आहे म्हणजे जाती निघून जाणं म्हणजे मतदार निघून जाण्यासारख आहे.




काँग्रेसने 1980 सालानंतर असं काय केलं की आपला जो किल्ला होता अधिक मजबूत केला अधिक लोकांना पक्षात प्रवेश दिला हे काही झालेलं नाहीये आणि काँग्रेस का निवडून येत नाहीये त्याच कारण हे आहे आणि भाजप का निवडून येतोय त्याच कारण जाती + मॅकॅनिजम आहे. असं पंढरपूर येथील Voice of media पुरस्कार समारंभाच्या पत्रकारांचे विचारमंथन या सदरात उत्तम कांबळे यांनी सांगितलं. 

संपूर्ण चर्चा ऐकण्या-पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.youtube.com/live/iTZrauPCs48?si=dEVMjAqKVstNzz3G

Similar News