फडणवीस, शिंदे आणि पवारांसह पुण्यातल्या लोकप्रतिनिधींना लेखिकेचं खुलं आव्हान

Update: 2025-08-09 12:10 GMT

पुणे : सामान्य नागरिकांना त्रास झाल्याशिवाय ते प्रशासन असो किंवा सरकार असो त्यांना थेट प्रश्नच विचारत नाहीत. मात्र, सोशल मीडियामुळं आता ग्रामपंचायत सदस्यांपासून ते थेट केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधानांनाही प्रश्न विचारायला नागरिक धजावत नाहीत.

पुणे शहर तसं सुसंस्कृत समजलं जातं. शिक्षणासाठीची पंढरीही म्हटलं जातं. औद्योगिकरण, वाढतं शहरीकरण यामुळं पुण्याचा आकार बदलत चाललाय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईहून त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी जात होते. त्यावेळी ते देखील पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकल्याच्या बातम्या आपण बघितल्या. त्यानंतर यंत्रणा कामाला लागली अन् वाहतूक कोंडींवर उपाय करायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतरही पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झालेली नाही, याचाच प्रत्यय आजही पुणेकर घेत आहेत.

पुण्यातल्या शेफाली वैद्य या लेखिका आहेत. शेफाली यांनी पुण्यातील कुठल्याही रस्त्यावरुन कुठल्याही प्रोटोकॉल शिवाय, कुठल्याही सहकार्याशिवाय प्रवास करुन दाखविण्याचं थेट आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळ यांच्यासर्व पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधींना दिलंय. प्रत्येक पुणे दररोज जो प्रवासात होणारा त्रास सहन करतोय, तो एकदा तरी अनुभवावा. कारण त्यानंतरच या वाहतूक कोंडीवर तुम्ही काहीतरी ठोस उपाययोजना कराल, असा उद्वीग्न टोमणाही शेफाली यांनी लगावलाय.

आले व्हीआयपी की करा वाहतूकीत बदल !

व्हीआयपी लोकांच्या दौऱ्यांचाही सामान्य नागरिकांना होणारा त्रास शेफाली वैद्य यांनी आपल्या ट्विटर पोस्टमधून व्यक्त केलाय. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा दौरा असेल तर त्यासाठी व्हीआयपी प्रोटोकॉलची आवश्यकता असू शकते, असंही त्या म्हणाल्या. मात्र, महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्याला एका पथकाची, पोलिसांच्या एस्कॉर्टची आणि वाहतूकीसाठी स्पेशल ट्रिटमेंटची गरज का पडते ? ही व्हीआयपी संस्कृती आता थांबली पाहिजे, असं रोखठोक मत शेफाली वैद्य यांनी व्यक्त केलंय.

पुण्यात आजकाल घराबाहेर फिरणे हा एकप्रकारे छळ झालाय. अवजड वाहनांना दिवसा रस्त्यावर वाहतूक करण्यास बंदी आहे, या साध्या नियमाकडे वाहतूक पोलिस का दुर्लक्ष करतात ? पुण्यातल्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली आहेत. त्यातच मेट्रोचं जाळं शहरभर पसरवलं जातंय. मेट्रोची कामं संथगतीनं सुरु आहेत, त्यामुळं अर्धे रस्ते खोदण्यात आले आहेत. पुण्यातील वाहनचालकांनीही थोडी शिस्त शिकण्याची गरज असल्याचा संताप शेफाली वैद्य यांनी व्यक्त केलाय.

Tags:    

Similar News