मिनाक्षी लेखी अक्षरशः पळाल्या; सोशल मिडीयावर 'गो बॅक मोदी'चा ट्रेंड सुरू

महिला कुस्तीगीरांबाबत प्रश्न विचारल्यानंतर केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी(Meenakshi Lekhi)अक्षरशः धावत सुटल्या, मात्र पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं नाही. सोशल मिडीयावर हा व्हिडीयो येताच Go_back_modi, #मोदीवापसभागो ट्रेंड व्हायला होण्यास सुरूवात झाली.

Update: 2023-05-31 06:28 GMT

भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. त्यानंतर महिला कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतर येथे धरणे आंदोलन ही सुरू केलं होतं. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी अत्यंत अपमानजनक स्थितीत फरफटवत नेऊन अटक केली. त्यानंतर काल या महिला कुस्तीपटूंनी आपले सर्व मेडल्स गंगेत विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र शेतकरी नेते राकेश टिकैत(Rakesh tikait) यांच्या मध्यस्थी नंतर या कुस्तीपटूंनी आपला निर्णय पाच दिवसांसाठी टाळला होता. महिला सुरक्षेच्या बाता मारून सत्तेत आलेल्या भाजपच्या एकाही नेत्याने याबाबत शब्दही काढलेला नाही. यावरून समाजमाध्यमांमध्ये मोठा आक्रोश व्यक्त होत होता. मात्र देशातील मुख्यप्रवाहातील माध्यमांनी महिला कुस्तीगीरांच्या चुका मोजून दाखवायला सुरूवात केली. काल दिवसभर मुख्य प्रवाहातील माध्यमे कुस्तीगीरांच्या मागे काही शक्ती असल्याचा आरोप करत आहेत. अशा वेळी मिनाक्षी लेखी यांची क्लिप येताच सोशल मिडीयावर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्रेंड सुरू झाले.

कुस्तीपटूंच्या बाबतीत भाजपचे नेते का बोलत नाहीत, तुम्ही महिला नेत्या आहात, तुमचं काय म्हणणं आहे असं एका महिला पत्रकाराने विचारताच मिनाक्षी लेखी धावत सुटल्या आणि आपल्या गाडीत जाऊन बसल्या. लोकांच्या प्रश्नांची ही भीती भाजपच्या अनेक नेत्यांना जाणवत असून महिला अत्याचाराच्या घटनांवर भाजप नेते प्रतिक्रीया व्यक्त करायला घाबरत आहेत.

सध्या सोशल मिडीयामध्ये मोदीं वापस भागो असा ट्रेंड असुन रस्त्यावर इंग्रजीमध्ये "GO BACK MODI" असं लिहलेले फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. राहुल थिलानी(Rahul tahiliani) याने आपल्या ट्विटरवर पुढील ऑल्मपिक स्पर्धेमध्ये मिनाक्षी लेखी या १०० मिटर रनिंग स्पर्धेत भाग घेणार आहेत. असं ट्विट केलं आहे तर, रोहिनी सिंग या पत्रकारानी देखील प्रश्नापासुन सुटका करत पळण्याची कोणती ऑल्मपिक स्पर्धा असती तर सर्वात अधिक मेडल भाजपमुळे भारत देशला मिळाले असते असं ट्विट केलं आहे.

Tags:    

Similar News