West Bengal election2021: 4 टप्प्यातील मतदान एकाच टप्प्यात घ्या, ममता बॅनर्जी यांची EC कडे मागणी

Update: 2021-04-15 17:15 GMT

सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका होत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप मध्ये या ठिकाणी जोरदार लढत आहे. विधानसभेच्या 294 जागांसाठी होत असलेली ही निवडणूक चार टप्प्यात होत आहे.

वाढत्या कोरोना विषाणूचे संक्रमण पाहता पश्चिम बंगालच्या निवडणुका 8 टप्प्यात घेण्यास तृणमूल काँग्रेसने विरोध केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढील 4 टप्प्यात होणारं मतदान एका टप्प्यात घ्यावं. अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांनी ही माहिती आपल्या ट्विटर हॅंडलवरून दिली आहे.

कोरोनाचा उद्रेक पाहता ही मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली असली तरी निवडणूक आयोग आता काय दखल घेणार? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेसाठी 8 टप्प्यात मतदान होत आहे. त्यातील 4 टप्प्यातील मतदान पार पडलं असून उर्वरित 4 जागांवर मतदान बाकी आहे. पाचवा टप्पा 17 एप्रिलला असणार आहे. सहावा टप्पा : २२ एप्रिल, सातवा टप्पा : २७ एप्रिल, आठवा टप्पा : शेवटचा टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मे रोजी लागणार आहे.

Tags:    

Similar News