मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जायकवाडीत निम्माच पाणीसाठा

Update: 2021-08-29 14:26 GMT

मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी ( jayakwadi dam ) च्या वरील धरणांतून आवक कमी झाल्याने यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी 28 ऑगस्ट रोजी एकूण पाणीसाठा 85 टक्क्यांच्या वर होता, तो यंदा 42 टक्क्यापेक्षा कमी आहे.

नगर, नाशिक मधील धरणांची सरासरी 90%पेक्षा अधिक झाली असली तरी जायकवाडीत ( jayakwadi ) पाण्याची आवक अत्यंत कमी आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पेक्ष्या जायकवाडी धरणात आवक कमीच आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा जायकवाडीत निम्माच पाणीसाठा

मराठवाड्याची तहान भागवणारं महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण

जायकवाडीची पाण्याची आवक घटली

जायकवाड़ी धरणाची पाणी क्षमता:- 2909.4 दलघमी

आजचा एकूण पाणी साठा:- 1646.46 दलघमी

आजचा जीवंत पाणी साठा:- 908.36 दलघमी

आजची धरणाची टक्केवारी:- 41.84%

मागील वर्षी याच तारखेला असलेली टक्केवारी: 85.22%

Tags:    

Similar News