औरंगाबादचे छ. संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव, जुन्या निर्णयावर ED सरकारचे शिक्कामोर्तब

ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णय कायम ठेवत शिंदे फडणवीस सरकारने त्या निर्णयांवर नव्याने शिक्कामोर्तब केले आहे.

Update: 2022-07-16 07:20 GMT

ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय कायम ठेवत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जुन्याच निर्णयावर नव्याने शिक्कामोर्तब केले आहे. तर या निर्णयाची माहिती मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे हे मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 29 जून रोजी अल्पमतातील ठाकरे सरकारने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले होते. मात्र हे निर्णय अल्पमतातील सरकारने घेतले होते. त्यामुळे त्यातून कायदेशीर अडचणी निर्माण होऊ नये, म्हणून आमच्या सरकारने हे निर्णय स्थगित केले आणि त्या निर्णयातील बारकावे तपासून नामांतराचे नव्याने निर्णय घेतले आहेत.

यामध्ये औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव दिले. तसेच सध्या हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यावर विधीमंडळ अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येईल. त्यानंतर हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यानंतर एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता दिल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.



Tags:    

Similar News