व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, तब्बल पाच कोटी ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत  

Update: 2022-01-11 14:48 GMT

व्हेल माशाची उलटी ही समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळखली जाते. मात्र, हीच उलटी विकणे कायद्याने गुन्हा आहे. असे असूनही मुरुड मधील तीन जणांनी विक्रीकरिता बेकायदेशीररीत्या बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे पथकाने तिघांना काशीद येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 किलो वजनाची उलटी, दोन मोटार सायकल असा 5 कोटी 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तीनही आरोपी विरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडात आतापर्यत दोन गुन्हे व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीबाबत घडले आहेत. याआधी अलिबागमधील तिघांना अटक केली होती.

शासनाने बंदी घातलेल्या व्हेल माशाची उलटी 10 जानेवारी रोजी विक्रीसाठी काशीद येथे एका हॉटेलात घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस नाईक अक्षय जाधव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था. गु.अ. शाखा, रायगड (Raigad) यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. त्यानुसार काशीद येथे स्थानिक गुन्हे पथकाने सापळा रचला होता.

Tags:    

Similar News