राज्यसभेतील गदारोळानंतर 'आप' चे तीन खासदार निलंबित

Update: 2021-02-03 07:00 GMT

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केल्या नंतर चर्चेसाठी १५ तासांचा वेळ राखून ठेवण्यावर सर्वांची एकमताने संमती झाली. मात्र या चर्चेला सुरवात होण्या आधीच 'आप' च्या खासदारांनी राज्यसभेत घोषणा देत गोंधळ घातला. यावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी कारवाई करत आपच्या तीन सदस्यानां एका दिवसासाठी निलंबित केले.

संसदेच हिवाळी अधिवेशन २९ तारखेपासून सुरू झालं असून आज सकाळी राज्यसभेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. आज सकाळी राज्यसभेत कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. त्यानंतर चर्चेसाठी १५ तासांचा वेळ राखून ठेवण्यावर सर्वांची एकमताने संमती झाली. मात्र या चर्चेला सुरवात होण्या आधीच 'आप' च्या खासदारांनी राज्यसभेत घोषणा देत गोंधळ घातला. यावर सभापतींनी कारवाई करत तिघांना एका दिवसासाठी निलंबित केले.

संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ तारखेपासून सुरू झालं. खर तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष्यानी एकत्र येत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. आधिवेशनच्या पाहिल्याच दिवशी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत संसदेच्या आवारात निदर्शने केली. दुसऱ्या दिवशी देखील या मुद्यावरून खूप गदारोळ झाला. तिन्ही कृषी कायदे मागे घ्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधकाकडून करण्यात येत होती. राज्यसभेतील आजच्या कामकाजाला सुरवात झाल्यानंतर या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सभापती व्यंकय्या नायडू यांनी १५ तासांचा वेळ राखून ठेवला.


Tags:    

Similar News