भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटूंबियांवर केले गंभीर आरोप

Update: 2021-09-08 05:46 GMT

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने तडस कुटूंबियांवर गंभीर आरोप केले आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत होत असल्याचे म्हणत आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी एक व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांना मदत मागितली आहे. या व्हिडीओत तडस यांच्या सुन रडत असल्याचे दिसत आहे.

तडस कुटुंब आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप त्यांनी आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजा तडस यांच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News