उत्तर प्रदेशमध्येही रविवारी लॉकडाऊन, विनामास्क फिराल तर १ हजार रुपये दंड

Update: 2021-04-16 10:02 GMT

महाराष्ट्रा बरोबरच देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. उत्तरप्रदेशमध्ये गुरुवारी एकाच दिवशी २२ हजार ४३९ नवीन रुग्ण समोर आले आहेत. तसेच एका दिवसात ११४ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत 7 लाख 66 हज़ार 360 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. सध्या राज्यात एक्टिव रुग्णांची संख्या 1लाख 29 हजार 848 इतकी आहे.

आत्तापर्यंत उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाने ९ हजार ४८० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमध्ये रविवारी लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसंच विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तीस १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

दरम्यान हे लॉकडाऊन पूर्ण ग्रामीण भाग आणि शहरी भागात लावण्यात येणार आहे. व पूर्ण प्रदेश सॅनिटाईझ करण्याचं काम या काळात केलं जाणार आहे.

काही ठिकाणी असे वृत्त प्रसारित केले जात आहे की, स्मशानभूमीमद्धे मृत व्यक्तींना जाळण्यासाठी लाकडं शिल्लक नाहीत, मात्र प्रशासनाने याचा विरोध केलेला आहे. लखनऊचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये एकाचवेळेस अनेक लोकांना अग्नि दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News