मास्कबाबत जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी बनवली अनोखी मानवी साखळी

देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतो आहे. पण कोरोना संकट कायम असल्याने कोरोना नियमांचे पालनही करण्याचे आवाहन केले जात आहे. लोकांमध्ये मास्क वापराबाबत जनतागृती व्हावी यासाठी विविध प्रकारे आवाहन केले जाते. प्रजासताक दिनाचे औचित्य साधन संगमनेरच्या वडगाव पान गावातील विद्यार्थांनी मानवी साखळी आणि रांगोळीच्या सह्याने मास्क घातलेली पृथ्वीची प्रकृती बनवून मास्कबबात जनजागृती करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.

Update: 2022-01-26 04:27 GMT

डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. सध्या संपूर्ण जग हे कोरोनाच्या महाभयंकर सावटाखाली जगत आहे. याविरोधात लढण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स आवश्यक आहे. या सामाजिक जाणिवेतून विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि मानवी साखळीच्या सहाय्याने सोशल डिस्टन्स ठेवून पृथ्वीची प्रतिकृती तर केली, तसेच पृथ्वीला मास्क घातलेला दाखवण्यात आला आहे. मास्क मंत्र विसरू नका .... काळजी घ्या .... सुरक्षित रहा . ! हा सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Tags:    

Similar News