परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना दिलासा, सरकारचा सकारात्मक निर्णय

परदेशात शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा सकारात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Update: 2022-01-17 14:04 GMT


परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटूंबातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचे भाडे एडव्हान्समध्ये देण्याचा निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी विमान प्रवासाची रक्कम विद्यापीठात प्रत्यक्ष हजर झाल्यानंतर मिळत होती. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांची विमान प्रवासाची रक्कम जुळवताना मोठी तारांबळ उडत होती. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाच्या तिकीटाचे पैसे अगाऊ देण्याची गरज होती. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची हेळसांड थांबावी यासाठी नियमावलीत बदल केला असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना पुर्वी स्वखर्चाने विमानाचे तिकीट काढून त्या देशात जावे लागत होते. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांची पैसे जमा करताना हेळसांड व्हायची. तर प्रत्यक्ष विद्यापीठात हजर झाल्यानंतर आणि बोर्डिंग पास जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाड्याचे पैसे मिळत होते. त्यामुळे नियमात बदल करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. याव्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा अधिक आहे त्या विद्यार्थ्याना मिळणारा विमान प्रवास खर्चाचा लाभ जुन्या नियमानुसारच मिळणार आहे, असेही या निर्णयात म्हटले आहे. हा निर्णय सोमवारी 17 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News