रायगडावर दिवाळी पहाट, मशालींच्या प्रकाशाने रायगड उजळला

Update: 2021-11-05 12:04 GMT

रायगड : श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेने आज शिवकालीन इतिहासाचा मानबिंदू असलेल्या किल्ले रायगडावर शिवचैतन्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.  या सोहळ्याच्या माध्यमातून समितीच्या सदस्यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसाची पहाट किल्ले रायगडवर साजरी केली.  या निमित्ताने किल्ले रायगडावर मशाली आणि दिप प्रज्वलीत करण्यात आले होते. 

नाणे दरवाज्यावरील मारुती दरवाजा, महादरवाजा, श्री जगदीश्वर मंदीर परीसर, श्री शिर्काई मंदिर, व्याडेश्वर मंदीर, भवानी कडा येथे या निमित्ताने विधिवत पूजन करण्यात आले.  यावेळी ३४८ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.  दिवाळीच्या पुर्वसंध्येला शिर्काईदेवी मंदिर ते राजसदरेपर्यंत महाराजांची मशाली घेऊन मिरवणूक काढण्यात आली. एकीकडे दिव्यांनी परिसर उजेडाने न्हाऊन निघालेला असताना दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून गेला होता.

Tags:    

Similar News