#Lockdownyatra : आता दुकान विकण्याची वेळ, व्यावसायिक हवालदिल

Update: 2022-01-04 13:16 GMT

"पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये कशीतरी दुकानं बंद ठेवली आता तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागलं तर दुकान विकण्याची वेळ येईल" अशा तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत, जळगावमधील व्यावसायिकांनी.... "अजूनही ग्राहक नसल्याने दोन दोन दिवस बोहनी होत नाही, कसं तरी दुकानाचे भाडं, लाईटबिल, व्यापाऱ्यांचे देणे, घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, सर्व मुश्किल झालं आहे, कसं जगतोय आमचं आम्हाला माहिती, अशा भावनाही या व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. लॉकडाऊनच्या चर्चेने दहशतीत असलेल्या व्यापाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी....


Full View

Tags:    

Similar News